भीम महोत्सव(२०२४)थाटात संपन्न...
भीम महोत्सव(२०२४)थाटात संपन्न...
प्रतिनिधी/सोलापूर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय समाज सेवा संघ, सोलापूर या नोंदणीकृत संस्थेच्या वतीन या वर्षी पाहिल्यांदाच दोन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन केले होते.
या दोन दिवसीय भीम महोत्सवान्तर्गत, ड्रीम पलेस, पोलिस कल्याण केंद, सेवासदन शाळेसमोर, सरस्वती चौक, सोलापूर येथे, दि.१९.४.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता भंते सारीपुत्त यांच्या हस्ते 'भीम बझार'चे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मंचकावर संस्थापक अध्यक्ष जयकर ठोंबरे सर, समाजसेवक यु.एफ़्.जानराव, शाहीर रमेश खाडे, कांबळे सर, डॉ.संभाजी मस्के, कृष्णा मेरगु, सौ.काडादी, सौ..खरटमल,लोंढे, संतोष क्षीरसागर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.दोन दिवस चाललेल्या या बाजारात २५ व्यवसायिकांनी सहभाग नोंदवला.
दि.२०.४.२०२४ रोजी सायंकाळी हैद्राबाद येथील चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यनारायण जाधव,मुंबईचे उद्योगपती सुनील व स्नेहा कांबळे,बहुजन विचार मंचचे अध्यक्ष आबासाहेब साबळे,शाहीर रमेश खाडे,नाट्य कलावंत मिलिंद ताकपेरे,आदर्श शिक्षक राम गायकवाड सर, स्नेहपुष्पचे कपिल भालेराव,भीम महोत्सव संयोजक जयकर ठोंबरे सर ,संकेत चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप् प्रज्वलन करुन सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली.
यानंतर संस्थापक अध्यक्ष जयकर ठोंबरे सर यांनी प्रास्ताविक करुन, मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला
तद्नंतर सांस्कृतीक कार्यक्रमात, डॉ.संजय कुमार मुरुमकर यांच्या बहारदार निवेदनात उत्तम कसबे यांचे बुद्धगीत,राजेश उडानशिव यांचे बासरीवादन तसेच राजू गायकवाड,शंकर बनसोडे,संजय गायकवाड, प्रज्ञा ननवरे, स्नेहा कसबे,संस्कृती ननवरे यांची भीमगीते आणि शाहीर ठोंबरे, सोहेल मुल्ला, हिमानी पाटील, गायत्री तेरकर यांचे नृत्य सादरीकरण झाले.
या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान श्रीमती प्रमिलाताई उबाळे (संस्थापिका, प्रेरणा सेवाभावी संस्था, सोलापूर) यांना भीमकन्या तर सिद्धाराम चाबुकस्वार (संयोजक, दलित चेंबर ऑफ़ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तथा, यशस्वी उद्योजकीय प्रेरक व मार्गदर्शक, सोलापूर) यांना भीमरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
समारोप सत्रातील या सांस्कृतिक कार्यक्रमात व पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वच मान्यवरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.या दोन दिवसीय भीम महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी, भारतीय समाज सेवा संघाच्या सर्व पदाधिकऱ्यांनी सहकार्य केले.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे(संपादक)
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240