श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.



प्रतिनिधी-अक्कलकोट 
 श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात व देवस्थान संचालित स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिर येथे मिती चैत्र शुक्ल पक्ष नवमी, शके १९४६, दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमी उत्सव [जन्मोत्सव] सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हल्ली नागरिकांच्या प्रति श्रीराम भक्तीची उत्कंठा वाढलेली आहे, परंतु श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने गेल्या अनेक वर्षापासून देवस्थानच्या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून श्रीराम भक्ती व सेवेची परंपरा जोपासलेली आहे. देवस्थानचे तत्कालीन मा.चेअरमन व थोर स्वामी सेवक कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे व विद्यमान चेअरमन महेश इंगळे यांनी ही या सेवेत अजिबात खंड पडू दिलेला नाही.देवस्थानचे तत्कालीन चेअरमन कै. कल्याणराव इंगळे यांनी श्री स्वामी सेवेबरोबरच देवस्थानचे मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिरच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या भक्ती व धर्मप्रसार प्रचार कार्याचा विडा उचलून या भक्ती प्रचार प्रसार कार्याची ओळख संपूर्ण देशात करून दिलेली आहे.यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकोट मध्ये श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा होत असतो. यंदाही या श्रीरामनवमी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित वटवृक्ष मंदिर व श्रीराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी असल्यामुळे दिनांक १५ एप्रिल वार सोमवार व दिनांक १६ एप्रिल वार मंगळवार रोजी सायंकाळी ४ ते ६ व दिनांक १७ एप्रिल वार बुधवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदीचे ह.भ.प.श्री योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर  यांची कीर्तनसेवा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न होणार आहे. तसेच दिनांक १७ एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमित्त देवस्थानच्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिर येथे सकाळी ८ ते १० या वेळेत श्री.हनुमान भजनी मंडळ -चिकुर्डा, जिल्हा लातूर, श्री.संत तुकाराम भजनी मंडळ वडगांव-जिल्हा उस्मानाबाद यांची भजनसेवा व सकाळी १० ते १२ या वेळेत नाशिक येथील ह.भ.प.रविंद्र महाराज अहिरे यांची कीर्तनसेवा होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव [पाळणा कार्यक्रम] होऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिर येथे दुपारी १२ ते २ या वेळेत भोजन महाप्रसाद दिला जाणार आहे, तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनासह कीर्तन श्रवण सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे(संपादक)
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर