धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न. पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध.

धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न.
पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध.
धर्मसंकीर्तन सोहळ्यात व्यासपीठावर पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांनी गायनसेवा सादर करताना दिसत आहेत.



प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यातील आजचे सहावे पुष्प पुण्यातील स्वामीभक्त गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांच्या शास्त्रीय गायन व भक्ती संगीत गायन सेवा सादरीकरणाने गुंफले गेले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला. या शास्त्रीय गायन सेवेत व भक्ती संगीत सेवेत गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर आदींनी सुरुवातीला राग हंसध्वनी, वातापी गणपती, स्वामी समर्थांच्या, निघालो घेऊन, अमृताहुनी गोड, कैवारी हनुमान, भाग्यदालक्ष्मी बारम्मा, रामनाम पायसके, स्वामी कृपा कधी करणार, नाही पुण्याची मोजणी, मन लागोरे, मुखे म्हणा स्वामी, स्वामी नामाचा महिमा मोठा अशी अनेकविध गाणी गाऊन रसिक भाविकांची दाद मिळवत शास्त्रीय संगीतातील विविध राग व बंदीश सादर करीत या गायन श्रवण सुखाने उपस्थित भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले.



या गायन सेवेत त्यांना सहगायन व हार्मोनियम वादन तुषार केळकर,तबल्यावर पं.पराग हिरवे यांनी साथसंगत केली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले तर सुत्रसंचालन मिलींद करंबेळकर यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, अमर पाटील, गिरीश पवार, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, उज्वलाताई सरदेशमुख, सागर गोंडाळ, स्वामीनाथ माटके, विपुल जाधव, प्रसाद सोनार, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, सचिन पेठकर, संतोष पराणे, अभिषेक गवंडी, स्वामीनाथ गायकवाड, प्रसाद किलजे आदिसह अनेक भाविक भक्त उपस्थित राहून या शास्त्रीय व भक्ती संगीत सेवेचा लाभ घेतला.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४९

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर