महामानवाच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १३३ विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य भेट.
महामानवाच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १३३ विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य भेट.
प्रतिनिधी-सोलापूर
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त१३३ विध्यार्थांना संपूर्ण शालेय साहित्य भेट देण्यात आले. कोनापुरे चाळ फॉरेस्ट येथील पंचशील तरुण मंडळाने हा उपक्रम घेतला. युवा समाजसेवक निलेश संगेपाग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्षे होते. मागील वर्षापासून निलेश संगेपाग यांनी या उपक्रमाची सुरवात केली आहे. पुढेही अश्याच प्रकारे सामाजिक कार्याद्वारे समाज परिवर्तनाचे कार्य करीत राहू असे मत निलेश संगेपाग यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आकाश गायकवाड, कृष्णा गायकवाड, मल्लेश मनलोर, आकाश उडानशिव, ज्योती ताई कापुरे, पूजा ताई गायकवाड, यश शिवशरण, सुधीर आनंद, प्रकाश माले, व्यंकटेश पल्ले, सचिन शासम, इमानुएल मंचले, व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास युवा उद्योजक निहाल किरनळ्ळी, जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन श्रीकांत भरले, समजसेविका अश्विनीताई सोलापुरे, ज्येष्ठ नागरिक सुजाता अविनाश मस्के, ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पल्ले, शिक्षिका साबळे, शिक्षिका मोरे ताई आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रसिद्ध उद्योजक एम. पाटील, ऍड. खतीब वकील, दलित चळवलीत नेते श्रीकांत वाघमारे, उद्योजक जुबेर हिरापुरे, उद्योजक गगन गोडसे, महिला उद्योजक सुचित्रा वाघमारे आदींनी विशेष सहकार्य केले.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे(संपादक)
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240