Posts

Showing posts from September, 2023

जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड.

Image
जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड. प्रतिनिधी - अक्कलकोट जि.प.प्रा मराठी शाळा जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड तर उपाध्यक्षपदी सुनिल राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी सदस्यपदी रवी पवार,प्रकाश चव्हाण,कविता राठोड, सचिन राठोड,सविता राठोड,महादेवी जाधव,कविता किसन राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर प्रसंगी नामदेव राठोड,गोविंद चव्हाण,विजय राठोड,रमेश कोळी,संजय जाधव,अक्षय राठोड,अनिल राठोड,आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे मा.ॲड.दयानंद उंबरजे यांची जेऊर गावातील १४ गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट व श्री गणेशाचे पूजन.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा.श्री.ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी  गणेशोत्सवानिमित्त  रविवार दि. २४/९/२०२३ रोजी जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी जेऊर गावातील युथ क्लब मंडळ,गुरुमूर्तेश्वर तरुण मंडळ,काशीविश्वेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ,चौडेश्वरी तरुण मंडळ,बमलिंगेश्वर तरुण मंडळ,अष्टविनायक तरुण मंडळ,पी.आर.के तरुण मंडळ,बसवनगर,गुरु म्हांतेश्वर तरुण मंडळ,शंकरलिंग तरुण मंडळ,जय हनुमान तरुण मंडळ, श्रीओम गणेश तरुण मंडळ,बालमित्र तरुण मंडळ आदी.गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश पूजनाचा मान मा.ॲड.दयानंद उंबरजे यांना प्राप्त झाला.एका दिवसात तब्बल १४ गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन ॲड.दयानंदउंबरजे साहेबांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.ॲड.दयानंद उंबरजे म्हणाले की,आज जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मला जो श्री गणरायाच्या पूजनाचा मान  दिला तसेच सर्वांनी माझ्यावरती दाखविलेले प्रेम,निष्ठा व विश्वास तसेच आपल्या सर्व मंडळाकडू...

सुवर्णाताई झाडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुरववाडीचे सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत सरकार मान्यता प्राप्त पद नियुक्तीचा कार्यक्रम सोलापूर येथे संपन्न झाला.दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई झाडे-खेलबुडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी मार्डी येथील सुवर्णाताई झाडे यांच्या स्वगृही सदिच्छा भेट देऊन त्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सुवर्णाताई झाडे यांच्या स्वगृघरातील गणरायाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळाप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर सुवर्णाताई झाडे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसा...

गुरववाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांची स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेल कार्यालयास सदिच्छा भेट.

Image
प्रतिनिधी - सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी गावचे विकासरत्न तथा  सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.तसेच श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सारा न्यूज नेटवर्क चे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, जी.के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष (दादा)गायकवाड,सिध्दार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी-स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत.

Image
महेश इंगळे यांचा सत्कार करताना संतोष पराणे, शिवशंकर बिंदगे, श्रीकांत झिपरे व अन्य सदस्य दिसत आहेत. प्रतिनिधी   - अक्कलकोट   श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत अहोरात्र झटत आहेत. भाविकांना वेळोवेळी सर्वोत्तम सोई सुविधा व उत्तम दर्शन नियोजन करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त स्वामी भक्त कसे स्वामींचे दर्शन घेतील याकडे महेश इंगळे यांचा नेहमीच कटाक्षाने लक्ष असतो. त्यामुळे ते स्वतः स्वामींच्या सेवेत आपले जीवन समर्पित करून भाविकांना नेहमीच सुलभ स्वामी दर्शन व्हावे याकरिता वेळोवेळी विविध नियोजन करीत असतात.तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार धार्मिक आधी सर्वच क्षेत्रात सतत कार्य करण्याच्या उमेदीने झटत आहेत. त्यातच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सारख्या राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानची जबाबदारीत स्वा...

अक्कलकोट तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन डेंग्यू आजाराला आळा घाला-विकीबाबा चौधरी.

Image
अक्कलकोट येथील हत्तीरोग नियंत्रण अधिकारी मगर मॅङम यांना निवेदन सादर करताना पीपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीभाऊ चौधरी यांच्या समवेत कार्यकर्ते. प्रतिनिधी - अक्कलकोट अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक औषधाची फवारणी करून डेंग्यू रोगाचा नायनाट करण्याबाबत संबंधित कार्यालय अधिकाऱ्यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले.अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वत्र रोगाची साथ वाढत आहे.जंतूनाशकांची फवारणी अक्कलकोट शहर व संपूर्ण ग्रामीण भागात करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे. तालुक्यात अनेक नागरिक सध्या आजारी पडताना दिसतात.त्वरीत अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.येत्या आठ दिवसात संपूर्ण तालुक्यामध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात यावी. अन्यथा तालुक्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङीच्या वतीने अंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा विकीबाबा चौधरी ...

नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनीषा(ताई)वसंत देसले यांचा शिवसेनेत प्रवेश.

Image
सामाजिक कार्यकत्यां सौ.मनीषा(ताई)वसंत देसले यांना शिवबंधन बांधताना मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे. प्रतिनिधी - मुंबई दि.१६ सप्टेंबर,२०२३ रोजी ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्रे मुंबई  येथील मातोश्री निवासस्थानी नाशिक येथील सामाजिक कार्यकत्यां सौ.मनीषा वसंत देसले यांनी सदिच्छा भेट देऊन मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.तसेच पक्ष बांधणीसाठी निश्चितच तळागाळातील जनतेपर्यंत शिवसेनचे विचार पोहचण्याचा प्रयत्न करीन असे अभिवचनही आदरणीय पक्ष प्रमुखांना दिले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठनेते मा. सुभाषजी देसाई,खासदार अरविंद सावंत ,संपर्क प्रमुख धात्रक उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख धात्रक सर,सौ.शुभांगी(ताई) पाटील,धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे,ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील,धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हेमंत साळुंखे,किरण भाऊ हिलाल,डॉ.सुशीलजी महाजन, साक्री येथील उपसभापती सौ.देसले ताई,युवती संघटक कु.प्रियंका जोशी डॉ.सुशील महाजन आदि मान्यवर उपस्थित होते. ------------------------------------...

एस व्ही सी एस पाठशाला बोरामणी मे राष्ट्रभाषा हिंदी दिवस संपन्न!

Image
प्रतिनिधी -सोलापूर  १४ सितंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस पाठशाला के प्रधानाचार्य श्रीमान आतनुरेसरजी के हाथो उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद के प्रतिमा का पूजन संपन्न हुआ इस समय पाठशाला के पर्यवेक्षक श्रीमान बिराजदार सरजी और पाठशाला के अध्यापक अध्यापिका उपस्थित थी तत्पश्चात इस समारोह के अध्यक्ष श्रीमान आतनुरे सरजी का पाठशाला के हिंदी विभाग प्रमुख प्रवीण कुंभार सर जी के हाथो सत्कार संपन्न हुआ  प्रमुख अतिथी के रूप में उपस्थित श्री बिराजदार सर जी का सत्कार श्रीमान व्हनकडे सर की हाथो संपन्न हुआ प्रवीण कुंभार का  सत्कार कला अध्यापक श्री बिराजदार सर और अध्यापिका राजमाने मॅडम जी का सत्कार रेऊरे मॅडम के हाथो संपन्न हुआ!  राष्ट्रभाषा हिंदी दिवस के अवसर पर अलग अलग प्रकार की प्रतियोगिता का आयोजन किया गया था वक्तृत्व ,कविता वाचन,समूह कविता वाचन आदी प्रतियोगिता का आयोजन किया गया था प्रतियोगिता के विजेता छात्र छात्राओ को  कलम, फुल और प्रमाणपत्र देकर उनका सन्मान किया गया !   कुल मिलाकर तीन गुटो मे प्रतियोगिता का आयोजन किया गया  इन प्रतियोगिता मे लगभग १२० छात्र सहभागी थे प्र...

नीलकंठेश्वर फाऊंडेशन आयोजित लकी ड्रॉ महेश इंगळेंच्या हस्ते वितरण.

Image
नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या लकी ड्रॉ साहित्यांचे पूजन प्रसंगी महेश इंगळे व अन्य तर दुसऱ्या छायाचित्रात बालाजी मुटकिरे यांनी महेश इंगळे यांचा सत्कार करतानाचे प्रसंग. प्रतिनिधी -  अक्कलकोट सोलापूरच्या साखर पेठेतील नीलकंठेश्वर मंदिर व नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशन जानराव समाजाच्या वतीने भव्य वार्षिक लकी ड्रॉ सोडतीचे वितरण मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी निलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या वतीने ड्राॅ साठी ठेवलेल्या दोन सायकल व दोन शिलाई मशीनचे पुजन व बक्षीस वितरण येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्याकाळी महेश इंगळे यांनी येथील श्री निलकंठेश्वर मंदिरात सदिच्छा भेट देऊन महादेवाची आरती करून दर्शन घेतले. याप्रसंगी ज्ञातीसंस्था कार्यालयात जानराव समाजाचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांनी महेश इंगळे व प्रथमेश इंगळेंचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.  यावेळी श्रीनिवास बंदगी यांच्या हस्ते सोलापुरी चादर तर, महेश धुळम यांच्या वतीने सोलापूरी टाॅवेल भेट देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी जानराव समा...

दक्षिण सोलापूरचे जन-नायक महादेव कोगनुरे....

Image
जन-नायक महादेव कोगनुरे.... प्रतिनिधी - सोलापूर घरात कोणत्याही प्रकारचा राजकारणाचा वसा नसताना,भक्कम आर्थिक पाठबळ नसताना, प्रस्थापित सत्तेला सुरुंग लावणं सोपं नाही. पण ही सत्ताबदलाची किमया करण्यासाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा महादेव कोगनुरे लढणार आहेत.लोकशाहीच्या मंदिरात सर्वोभौमत्त्वाची पूजा बांधावी हा विचार घेऊन महादेव कोगणुरे हे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. काही वर्षांपासून सामाजिक जाणिवांचा वसा घेऊन निस्वार्थीपणे वंचित, दुर्बल, गोर-गरिबांसाठी काम करणारा, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या महादेव कोगनुरे यांनी समाजभान जपत राजकीय क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे. वाचनाची, लिखाणाची, वक्तृत्वाची आवड असल्याने अवती-भवतीच्या घटनांचा वेध ते विविध माध्यमातून टिपत असतात शिवाय सामाजिक परिस्थितीविषयी त्यांच्या जाणिवा प्रगल्भ आहेत. महादेव कोगनुरे यांचे संघटन कौशल्य त्यांच्या नेतृत्वगुणांच्या उद्याचा हुंकार ठरणार आहे.दक्षिण तालुक्यात युवकांचं संघटन करून आपला तालुका आदर्श कसा करता येईल, या विचाराने गावातील तरुणांच्या साथीने एम. के. फाऊंडेशनची स्थापना झाली. आणि खऱ्या...

एस.व्ही.सी.एस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरामणी येथील "जिल्हा स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार" प्राप्त गुणवंतांचा सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर प्रशालेचे नाव उज्वल करणारी बातमी म्हणजे प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री बिराजदार.एस.ए सर आणि सहशिक्षिका सौ.वैशाली डांगे मॅडम यांना मिळालेला "जिल्हा स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार" प्राप्ती  पर्यवेक्षक श्री बिराजदार सर आपल्या अध्यापनातून सातत्याने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण,ज्ञान आणि शिस्त यांचे पाठ देण्याचे कार्य करत आहेत.आपल्या भारदस्त वाणीतून विद्यार्थ्यांवर ठसा उमटवणारे असे पर्यवेक्षक सर यांना "जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार "प्राप्त झाला.तसेच सहशिक्षिका सौ.वैशाली डांगे मॅडम यादेखील आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य उत्तमरीतीने करत असतात. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अतनुरे सर व सौ. शरणार्थी मॅडम यांच्या हस्ते श्री.बिराजदार सर आणि सौ.डांगे मॅडम या गुणवंत शिक्षकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अतनुरे सर यांनी या सत्कारमूर्तींचे कौतुक करत त्यांच्या भावी शिक्षण कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांचा वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर   आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष मा.सुबोधजी वाघमोडे (साहेब)यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु व मित्रपरिवाराच्या वतीने  मा.सुबोधजी वाघमोडे(साहेब)यांचा शाल,फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.  याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)नेते तथा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु,महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महिला अध्यक्षा  लैलाताई जमादार, रिपाई महिला जिल्हाध्यक्षा नसरीन शेख, रावसाहेब प्रक्षाळे,रफिक शेख,श्रीमंत गायकवाड,मनीष होटकर आधी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०