अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे मा.ॲड.दयानंद उंबरजे यांची जेऊर गावातील १४ गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट व श्री गणेशाचे पूजन.
प्रतिनिधी-अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा.श्री.ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी गणेशोत्सवानिमित्त रविवार दि. २४/९/२०२३ रोजी जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी जेऊर गावातील युथ क्लब मंडळ,गुरुमूर्तेश्वर तरुण मंडळ,काशीविश्वेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ,चौडेश्वरी तरुण मंडळ,बमलिंगेश्वर तरुण मंडळ,अष्टविनायक तरुण मंडळ,पी.आर.के तरुण मंडळ,बसवनगर,गुरु म्हांतेश्वर तरुण मंडळ,शंकरलिंग तरुण मंडळ,जय हनुमान तरुण मंडळ, श्रीओम गणेश तरुण मंडळ,बालमित्र तरुण मंडळ आदी.गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश पूजनाचा मान मा.ॲड.दयानंद उंबरजे यांना प्राप्त झाला.एका दिवसात तब्बल १४ गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन ॲड.दयानंदउंबरजे साहेबांनी केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.ॲड.दयानंद उंबरजे म्हणाले की,आज जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मला जो श्री गणरायाच्या पूजनाचा मान दिला तसेच सर्वांनी माझ्यावरती दाखविलेले प्रेम,निष्ठा व विश्वास तसेच आपल्या सर्व मंडळाकडून यथोचित सत्कार केल्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वाना सुख,समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. पुढे बोलतानाॲड.दयानंद उंबरजे साहेब म्हणाले की,मी आज देशात मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य व निष्ठावंत कार्यकर्ता असून अकलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार तथा भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.सचिन(दादा)कल्याणशेट्टी यांनी माझ्यावर पक्षाची जी काही जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी व त्या पदास निश्चितच न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.आमदार सचिन (दादा)कल्याण शेट्टी यांच्याकडून मिळालेल्या पदाला एकनिष्ठ राहून मी काम करीत आहे. मागील चार महिन्यात आपल्या (जेऊर) गावात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत साधारण ६८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मी मिळवून दिला आहे.
पंचायत राज व ग्रामविकासच्या माध्यमातून विशेषतः कृषी विषयक(शेतीशी)निगडित प्रश्न,आरोग्य,शिक्षण,केंद्रशासन व राज्यशासन अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील वंचित,उपेक्षित घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही ॲड.दयानंद उंबरजे साहेबांनी दिली.तसेच भविष्यात वंचित,पीडित घटकातील गोर -गरीब जनतेच्या कोणत्याही समस्या किंवा अडचणी असतील त्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी सदैव कार्यतप्तर आहे.त्याचप्रमाणे मी माझ्या वकिली(ॲडव्होकेट)क्षेत्राशी निगडित जो कोणी गरीब व्यक्ती पीडित आहे व ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अश्या व्यक्तीचा न्यायप्रविष्ट विषयासंदर्भात मोफत सल्ला व मार्गदर्शन मी करण्यास इच्छुक आहे.
दरम्यान विविध गणेशोत्सव मंडळानी श्री गणरायाच्या पूजेस निमंत्रित करून दयानंद उंबरजे साहेबांना जो मान दिला त्या सर्व गणेशोत्सव मंडळांना लिखित स्वरूपात पक्षाच्या लेटर हेडवर योग्य तो मजकूर टाइप करून ॲड.दयानंद उंबरजे साहेबांनी आभार मानलेले पत्र सुपूर्द केले.
यावेळी गणेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच जेऊर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240