एस.व्ही.सी.एस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरामणी येथील "जिल्हा स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार" प्राप्त गुणवंतांचा सत्कार.
प्रतिनिधी -सोलापूर
प्रशालेचे नाव उज्वल करणारी बातमी म्हणजे प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री बिराजदार.एस.ए सर आणि सहशिक्षिका सौ.वैशाली डांगे मॅडम यांना मिळालेला "जिल्हा स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार" प्राप्ती पर्यवेक्षक श्री बिराजदार सर आपल्या अध्यापनातून सातत्याने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण,ज्ञान आणि शिस्त यांचे पाठ देण्याचे कार्य करत आहेत.आपल्या भारदस्त वाणीतून विद्यार्थ्यांवर ठसा उमटवणारे असे पर्यवेक्षक सर यांना "जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार "प्राप्त झाला.तसेच सहशिक्षिका सौ.वैशाली डांगे मॅडम यादेखील आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य उत्तमरीतीने करत असतात.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अतनुरे सर व सौ. शरणार्थी मॅडम यांच्या हस्ते श्री.बिराजदार सर आणि सौ.डांगे मॅडम या गुणवंत शिक्षकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अतनुरे सर यांनी या सत्कारमूर्तींचे कौतुक करत त्यांच्या भावी शिक्षण कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.व्हनकडे सर यांनी केले.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.व्हनकडे सर यांनी केले.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240