जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड.

जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड. प्रतिनिधी - अक्कलकोट जि.प.प्रा मराठी शाळा जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड तर उपाध्यक्षपदी सुनिल राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी सदस्यपदी रवी पवार,प्रकाश चव्हाण,कविता राठोड, सचिन राठोड,सविता राठोड,महादेवी जाधव,कविता किसन राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर प्रसंगी नामदेव राठोड,गोविंद चव्हाण,विजय राठोड,रमेश कोळी,संजय जाधव,अक्षय राठोड,अनिल राठोड,आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०