Posts

Showing posts from September, 2025

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम (बापू) खेलबुडे यांची निवड.

Image
प्रतिनिधी – सोलापूर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम (बापू) खेलबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड झाली.   विक्रम (बापू)खेलबुडे यांचीअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार राम हुंडारे व सिद्धार्थ भडकुंबे यांच्या वतीने बुके देऊन सत्कार करताना... रविवार,२१ सप्टेंबर रोजी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी विक्रम खेलबुडे होते. सभेत सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त मांडले व खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. दोन्ही अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी विक्रम खेलबुडे यांच्या नावाची सूचना केली, तर आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. अशा प्रकारे खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदावर विराजमान होत विक्रम प्रस्थापित केला. या विश्वासास पात्र राहून काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे व सहाय्यक अधिकारी अनिल ...

नाशिकमध्ये पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध.

Image
प्रतिनिधी-सोलापूर नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, अस्लम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुम...

गुरववाडीतील पाझर तलाव फुटण्याचा धोका सरपंचांच्या सतर्कतेमुळे टळला.

Image
गुरववाडी (ता.अक्कलकोट),  दि.१५सप्टेंबर, २०२५ मौजे गुरववाडी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुजारी शेतातील पाझर तलाव धोकादायक स्थितीत पोहोचला होता. तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती ग्रामपंचायत व तलाठी मार्फत तहसीलदार कार्यालयास देण्यात आली.तक्रार मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत तलाव फुटण्यास अवघे दीड फूट अंतर उरल्याचे स्पष्ट झाले. तातडीच्या उपाययोजनांतर्गत जेसीबीच्या मदतीने सांडद्वारे पाणी बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गावातील जेसीबी मालक सागर देवरमनी तसेच गावचे सरपंच व विकासरत्न म्हाळप्पा पुजारी यांच्या पुढाकाराने पाझर तलावाचा मार्ग मोकळा करण्यात आला. या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळला. याप्रसंगी सरपंच म्हाळप्पा पुजारी म्हणाले, “गावाच्या हितासाठी माझे कर्तव्य पार पाडले. वेळेवर अभियंता समीर शेख यांना कल्पना देऊन त्यांच्याशी समन्वय साधला. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला मार्ग मोकळा करून दिला नसता, तर मोठा अपघात घडला असता.” या कारवाईत सरपंच म्हाळप्पा पुजारी, माजी सरपंच ...

एनआरएलएमच्या धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवे धोरण – जलशक्ती विभागाचे सचिव अशोक के. के. मिना

Image
नवी दिल्ली – देशभरातील पाणी व स्वच्छता तसेच पाणी गुणवत्ता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम)च्या धर्तीवर नवे धोरण राबविण्यात येणार असल्याची ग्वाही जलशक्ती विभागाचे मुख्य सचिव अशोक के. के. मिना यांनी दिली. दीनदयाळ अंत्योदय भवन (CGO कॉम्प्लेक्स) येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय पाणी व स्वच्छता कर्मचारी फेडरेशनने विविध अडचणींबाबत निवेदन देऊन चर्चा केली. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सचिव मिना यांचा सत्कार केला. यावेळी जलजीवन मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत कुमार सारस्वत, राष्ट्रीय सचिव शंकर बंडगर, कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, राजस्थानचे कोसलेंदर सिंग, बीआरसी-सीआरसी संघटनेचे विलास निकम, योगेश सुरडकर व जयंंत वर्मा उपस्थित होते. मिना म्हणाले, “पाणी व स्वच्छता क्षेत्रातील अनुभवी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्या राज्यांत अनुभवी कर्मचारी हटविण्यात आले, तेथे कामकाजावर परिणाम झाला आहे. जलजीवन मिशनची गुणवत्ता टिकविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन धोरण राबवले जाईल.” बैठकीत देशभरात ...

कै.शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन

Image
 दु:खद वार्ता प्रतिनिधी -सोलापूर  कै. शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून — मुरलीधर चौक, स्लॉटर हाऊस, वीरजवान तरुण मंडळ, सायबोळु किराणा दुकानाजवळ, लष्कर, सोलापूर — येथून निघून मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच- सिने अभिनेत्री अलका कुबल

Image
    मुरूम- प्रतिनिधी मुलांना संस्कारयुक्त बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर, निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग, परिश्रम व कष्ट याची जाणीव करून देणे. समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत व एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.          रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) रोजी आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.  यावेळी अनुसया मिरकले, वैभव वेल्हाळ, संगीता माकणे, तनुजा गाढवे, दत्ता राठोड, प्रिया वाकड...

त्रिमूर्ती गणेश मंडळ, मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा उत्साहात-पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दि.1सप्टेंबर, 2025 रोजी त्रिमूर्ती गणेश मंडळ मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गणपती बप्पांच्या पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने नेताजी(भाऊ)खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते छोट्या मुला-मुलींनी सादर केलेल्या टाळवादन व नृत्यप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यानंतर श्रींची आरती संपन्न झाली. कार्यक्रमाला त्रिमूर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------------------------------- 🔹जनता संगर्ष न्यूज, सोलापूर  ▪️संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर.

Image
प्रतिनिधी -सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने होटगी रोडवरील विकास नगर येथील रत्नदीप हाउसिंग सोसायटी शेजारील शाळा परिसरात घेण्यात येणार आहे. या शिबिराचा शुभारंभ सकाळी १०:३० वाजता होणार असून यात रक्त तपासणी (CBC), रक्तदाब तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे.