माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर.

प्रतिनिधी -सोलापूर
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने होटगी रोडवरील विकास नगर येथील रत्नदीप हाउसिंग सोसायटी शेजारील शाळा परिसरात घेण्यात येणार आहे.
या शिबिराचा शुभारंभ सकाळी १०:३० वाजता होणार असून यात रक्त तपासणी (CBC), रक्तदाब तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.