गुरववाडीतील पाझर तलाव फुटण्याचा धोका सरपंचांच्या सतर्कतेमुळे टळला.

गुरववाडी (ता.अक्कलकोट), 
दि.१५सप्टेंबर, २०२५ मौजे गुरववाडी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुजारी शेतातील पाझर तलाव धोकादायक स्थितीत पोहोचला होता. तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती ग्रामपंचायत व तलाठी मार्फत तहसीलदार कार्यालयास देण्यात आली.तक्रार मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत तलाव फुटण्यास अवघे दीड फूट अंतर उरल्याचे स्पष्ट झाले. तातडीच्या उपाययोजनांतर्गत जेसीबीच्या मदतीने सांडद्वारे पाणी बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी गावातील जेसीबी मालक सागर देवरमनी तसेच गावचे सरपंच व विकासरत्न म्हाळप्पा पुजारी यांच्या पुढाकाराने पाझर तलावाचा मार्ग मोकळा करण्यात आला. या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळला.
याप्रसंगी सरपंच म्हाळप्पा पुजारी म्हणाले, “गावाच्या हितासाठी माझे कर्तव्य पार पाडले. वेळेवर अभियंता समीर शेख यांना कल्पना देऊन त्यांच्याशी समन्वय साधला. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला मार्ग मोकळा करून दिला नसता, तर मोठा अपघात घडला असता.”
या कारवाईत सरपंच म्हाळप्पा पुजारी, माजी सरपंच नागपा देवरमनी, माजी डेप्युटी सरपंच कल्याण रावजी, तलाठी आलदार, ग्रामसेवक के.जी. मकानदार, जेसीबी ऑपरेटर राहुल पाटोळे, शिवानंद मुंडेवाडी, श्रीकांत गुरव, शेतकरी धनराज वंकारी, सागर वंकारी, शरणाप्पा पुजारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे व प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे गावाला मोठ्या संकटातून दिलासा मिळाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर