Posts

Showing posts from April, 2025

डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद...

Image
डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद... प्रतिनिधी -सोलापूर  सामाजिक, न्याय, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर भारतीय समाज उभा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासमोर येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले. येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये विद्यार्थी विकास विभाग , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दामा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील,  सरचिटणीस प्रा. महेश माने सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. प्रभाकर कोळेकर डॉ. केदारनाथ काळवणे डॉ. संजय गायकवाड प्राचार्य डॉ. मधुकर पवार आधीची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक  डॉ. युवराज सुरवसे यांनी केले.  यावेळी सपाटे म्हणाले, ...

पत्रकार नितीन पात्रे यांना मातृशोक

Image
  प्रतिनिधी-सोलापूर    माजी महापौर बुद्धवासी मुरलीधर पात्रे यांच्या पत्नी मंगल पात्रे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा न्यू बुधवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरापासून उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता निघणार आहे. रूपा भवानी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार नितीन पात्रे यांच्या त्या मातोश्री होत.

महात्मा बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान.

Image
बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या    विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अनिता मुदकन्ना, कमलाकर मोटे, दत्ता इंगळे, शिवशरण वरनाळे व अन्य. मुरूम, ता. उमरगा,( प्रतिनिधी )  महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा रविवारी (ता. २७) रोजी बसव सहकार भवनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटी चे कमलाकर मोटे होते. प्रमुख अतिथी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख  प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना, मुरूमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दत्ता इंगळे, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना, बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थी  संध्या उटगे, विष्णू जाधव, राहुल देशपांडे, प्रवीण गायकवाड, तेजस्विनी मुदकन्ना, शुभम गाय...

डॉ.रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवपूरस्कार जाहीर.

Image
प्रतिनिधी -ता.मुरूम  येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग काशिनाथ पुराणे यांना  ए.डी. फौंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार २०२५ निमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दि.२५मे वार रविवार रोजी सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे फौंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी पत्राद्वारे कळविले आहे. डॉ.रामलिंग पुराणे यांचा संघटनात्मक धोरण, सामाजिक कार्य, पत्रकारिता वर पकड मजबूत असून, समाजासाठी उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि सातत्य असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पन्नास हुन अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. डॉ.पुराणे यांचे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. तालुका,जिल्हा,राज्य,राष्ट्रीय पातळीवर त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. राज्यातील ध...

नांदणी टोल नाक्याजवळ गांजासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त ; सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांची दमदार कारवाई दोन संशयितांना कोठडी.

Image
प्रतिनिधी-सोलापूर नांदणी टोल नाक्याजवळ भोपाळहून (मध्यप्रदेश) कर्नाटकात दोन प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघालेल्या दोघांना मंद्रूप पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून आठ लाख ३८ हजार रुपयांचा ३३ किलो गांजा व २२ लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण ३० लाख ३८ हजार ३७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. सोलापूर - विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पीएसआय चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर-विजयपूर महामार्गावर गस्त घालत होते. तेव्हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की नांदणी येथील टोलनाक्याजवळ एक टेम्पो थांबलेला आहे. त्यामधून गांजा सारखा वास येत आहे. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांनी  याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस गेले. तेव्हा टेम्पोत दोघेजण झोपले होते. त्यांना नावे विचारली असता जगदीश नन्नुलाल मेहर (वय ३९, रा. मिसरोड, शाहू मोहल्ला, भोपाळ, मध्य प्रदेश) व बादशाह लत...

समतेवर आधारित नवभारताची उभारणी आवश्यक - डॉ. ऋषिकेश कांबळे.

Image
मुरूम, ता.उमरगा भीम नगर येथे व्याख्याना प्रसंगी बोलताना ऋषिकेश कांबळे, किरण सगर, महेश मोटे, स्वाती कांबळे व अन्य . प्रतिनिधी -मुरूम, ता.उमरगा, डॉ..आंबेडकर यांनी सामाजिक समता, आर्थिक न्याय आणि बौद्धिक स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारलेला भारत घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा विश्वास होता की, प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आत्मसन्मान मिळालाच पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत, यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या. जातीभेद, अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट व्हावा, हा त्यांचा प्रमुख हेतू होता. समतेवर आधारित नवभारताची उभारणी होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. भीम नगर, मुरूम ता. उमरगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित बुधवारी (ता. २३) रोजी व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन स...

शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा तडकलकर यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.

Image
वर्षा विजय तडकलकर यांचा श्री वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-सोलापूर  येथील दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या होटगी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी अक्कलकोटचे रहिवासी वर्षा तडकलकर यांची पदोन्नती झाली. या पदोन्नती प्रित्यर्थ वर्षा तडकलकर यांनी आज सहकुटुंब श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी पदी वर्षा तडकलकर यांची पदोन्नती झाल्याप्रित्यर्थ   श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी वर्षा तडकलकर यांनी अत्यंत प्रामाणिक व जिज्ञासू वृत्तीने अक्कलकोट नगरपालिकेत उपशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक अशा विविध पदावर अत्यंत तळमळीने काम केले आहे. त्याचे फळ आज स्वामी समर्थांनी त्यांना दक्षिण सोलापूरच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीच्या माध्यमातून दिले आहे. अक्कलकोट नगरपालिका इतिहासात शिक्षकामधून शिक्षण...

श्री विठ्ठलसाई कारखान्याच्या अध्यक्षपदी बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड.

Image
मुरुम -प्रतिनीधी  तालुक्यातील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी सादिक काझी यांची निवड करण्यात आली आहे. मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार झाली आहे. कारखान्याचे सर्व २१ संचालक बिनविरोध निवडुन आल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी (दि.२२) कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणुन जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे यांनी काम पाहिले. चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नांव रामकृष्णपंत खरोसेकर यांनी सुचवले त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सादिक काझी यांचे नांव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी सभेत एक एकच नांव सुचविल्याने अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सादिक काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. सभेस नवनिर्वाचित संचालक बापुराव पा...

रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन....

Image
मुरूम, ता. उमरगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन बापूराव पाटील करताना पदाधिकारी, रक्तदाते व अन्य. मुरूम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यशवंत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर शुक्रवारी (ता. १८) रोजी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद गुतेदार, महालिंग बाबशेट्टी, सतिश सावंत आदींची उपस्थिती होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हावळे, उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड, सचिव अमित देडे, सहसचिव डॉ. अजिंक्य मुरूमकर, जिल्हा कृषी पणन तज्ञ अमित भालेराव, प्राचार्य आकाश गवई, माजी नगरसेविका संध्या सावंत, माजी नगरसेविका मीरा सोमवंशी, मुख्याध्यापिका उर्मिला तुपेरे, अश्विनी कांबळे, तृप्ती गायकवाड, आनंद कांबळे, किरण गायकवाड, आशिष गवई, उत्कर्ष गायकवाड, वैभव कांबळे, प्रशांत कांबळे...

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते नामवीणा सप्ताहाचे शुभारंभ.

Image
नामवीणा सप्ताह शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळे, महेश इंगळे व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट          येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात आज दिनांक १९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.         प्रारंभी मुख्य गाभाऱ्यात मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते वीणा पुजन होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर मंदार महाराज पुजारी व महेश इंगळे यांचे हस्ते प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी आहे. याप्रसंगी उज्वलाताई सरदेशमुख, इरपा हिं...

सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांत पारंगत असलेले सोलापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचंड संपत्ती, समाजात प्रतिष्ठा आणि वैद्यकीय क्षेत्रात बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाणारे डॉ. वळसंगकर यांची ही आत्महत्या सर्वांनाच हादरवून टाकणारी ठरली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.  डॉ. वळसंगकर यांच्या नावावर राज्यातील अनेक रुग्णालयांतून रुग्ण पाठवले जात असत.  त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी महिने महिने प्रतीक्षा यादीत रुग्ण राहात असत. वैद्यकीय सेवेमुळे त्यांना “सोलापूरचे भूषण” असेही संबोधले जात होते. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.डॉक्टर वळसंगकर हे आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते.ही आत्महत्या केवळ एका ड...

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप.

Image
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप. दुधनी /प्रतिनिधी   अक्कलकोट तालुका मधील सिन्नूर गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विविध उपक्रम घेत जयंती साजरी करण्यात आले.दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री बुद्ध आणि भीम गीतांचे कार्यक्रम लक्ष्मी भजना संघ सिन्नूर यांच्या भजन कार्यक्रम ठेवण्यात आले होते. रात्री 12 वाजता फटाके व केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता प्रतिमा पूजन प्रमुख मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवा पत्रकार निगप्पा निंबाळ, रिपाई दुधानी मुस्लिम आघाडी अध्यक्ष माहेदिमिया जिडगे, दुधानी शहर अध्यक्ष गोरकनाथ धोदमणी इत्यादी उपस्तित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रिपाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी होते.तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजन पत्रकार निगप्पा निंबाळ यांच्या हस्ते करण्यात आले तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन रिपाई मुस्लिम आघाडी अध्यक्ष माहेदिमिया जिडगे यांच्या हस्ते कर...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल ''सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन"

Image
प्रतिनिधी -सोलापूर  महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागव जिल्हा परिषदेच्या  संयुक्त विद्यमाने दि.08 एप्रिल  ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करणेत आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुलोचना सोनवणे यांनी दिली. शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उददेशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करणेत येते.  या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी विस्तार अधिकारी एम जी म्हेत्रे, अधिक्षक सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, राजश्री कांबळे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.  सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यका...

कै. माधवराव (काका) पाटील यांची ९९ वी जयंती विविध ठिकाणी साजरी.

Image
प्रतिनीधी-मुरूम ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरु मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची ९९ वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी रविवारी  (ता. ६) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशिद शेख आदिंची प्रमुख उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, माजी जिल्हा परिषद सद...

अक्कलकोटचे चंद्रकांत वेदपाठक यांना "श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्टीत " श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्कार " प्रतिष्ठानचे संस्थापक राजेशभाऊ  पंडित रेणापूरकर व मान्यवरांच्या  हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन पुष्पहार घालून सत्कार करून प्रदान करण्यात आला.      पंढरपूर येथे  सोनार समाजाच्या मेळाव्यात चंद्रकांत वेदपाठक यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून वेदपाठक यांनी सोनार समाजातील गरजू लोकांकरिता विशेष असे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.    चंद्रकांत वेदपाठक यांना श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका संघटक सूर्यकांत कडबगांवकर,आंतरराष्ट्रीय लायन्स चे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी, लायन्स प्राथमिक शाळेचे अध्यक्ष राजेंद्र...