महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप.
दुधनी /प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका मधील सिन्नूर गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विविध उपक्रम घेत जयंती साजरी करण्यात आले.दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री बुद्ध आणि भीम गीतांचे कार्यक्रम लक्ष्मी भजना संघ सिन्नूर यांच्या भजन कार्यक्रम ठेवण्यात आले होते. रात्री 12 वाजता फटाके व केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता प्रतिमा पूजन प्रमुख मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवा पत्रकार निगप्पा निंबाळ, रिपाई दुधानी मुस्लिम आघाडी अध्यक्ष माहेदिमिया जिडगे, दुधानी शहर अध्यक्ष गोरकनाथ धोदमणी इत्यादी उपस्तित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रिपाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी होते.तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजन पत्रकार निगप्पा निंबाळ यांच्या हस्ते करण्यात आले तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन रिपाई मुस्लिम आघाडी अध्यक्ष माहेदिमिया जिडगे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर समुदयिक बुद्ध वंदना घेण्यात आला.झेंडा कट्याचे पूजन रिपाई दुधानी शहर अध्यक्ष गोरकनाथ दोधामणी यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजरोहन माजी ग्रामपंचायत सदस्य सिन्नूर तथा मुस्लिम अध्यक्ष हाजीमलंग मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला.मान्यवरांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सिन्नूर ग्रामपंचायत कार्यलय येते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन सरपंच कल्पना सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच प्रकाश कळसगोंडा, ग्रामपंचायत लिपिक शिवपुत्र जेवर्गी, ग्रामपंचायत आपरेटर शिंगे, शिराज पठाण,शिपायी राजू कांबळे, सैपना मुल्ला,, निलवा कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हा परिषद प्रथमिक कन्नड शाळा, मराठी शाळा, उर्दु शाळा येते ही महामानाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमास शाळेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरचे सत्कार करण्यात आले.त्यानंतर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्या समयोचित आंबेडकर जीवनावर आधारित भाषण झालेत.रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना असे म्हणालेत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा इतर महापुरुष यांच्या जयंती मोठया धिमाकात जयंती केली जाते.ते करावेच.परंतु त्या महापुरुष चे विचारसरणी अंगीकृत करून तो जडणगडणीत आणणे तितकेच आपले सर्वांचे कर्तव्य आहेत. पण आज महापुरुष यांना आपापल्या जातीत वाटून घेतलेला आहेत.हे चुकीचा असून आपण शिक्षक लोकांनी विध्यार्थीना योग्य मार्गदर्शन करून महापुरुसांना अभिप्रेत असलेल्या समाज घडवण्याचे काम तुमच्या वर असल्याचे सांगितले.जयभिम तरुण मंडळ सिन्नूर चे प्रमुख मार्गदर्शक जयकुमार सोनकांबळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना असे म्हणालेत की सर्व महापुरुष यांच्या जयंती निमित्त जयंती साजरी करत असताना अनर्थ खरच टाळून ते समजपयोगी कार्यक्रम घ्यावे.आमचे मार्गदर्शक शिव-बसव-डॉ. बी. आर. आंबेडकर मागासवर्गीय बहुउदेसीय सामाजिक संस्थ अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ मढीखांबे यांनी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य सामुदाहिक विवाह सोहळा ठेवून अनेकांचे विवाह करून दिले. तसेच अनेक महापुरुष यांच्या जयंती निमित्त अन्न वाटप, गरीबना मदत, वृक्षारोपण शैक्षणिक साहित्य वाटप, विविध कर्तृत्वान महिलांचे सन्मान, इत्यादी समाज उपयोग कार्यक्रम घेतात.त्याचाच एक कार्यकर्ते म्हणून आम्ही पण एक छोटासा उपक्रम ठेवला आहे. भविष्यात ही असे कार्यक्रम ठेऊन जयंती साजरी करू असे म्हंटले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा जयभिम तरुण मंडळ सिन्नूर चे कार्याध्यक्ष हुचाप्पा कांबळे व जयभिम तरुण मंडळ सिन्नूर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थीना वही पेन, चॉकलेट, पेढा वाटप करण्यात आले.व शाळेच्या आवरत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यपक रमेश घोदे सर, मराठी शाळेचे मुख्यद्यापक भाग्यश्री कोष्टी मॅडम, उर्दू शाळेचे मुख्यधपाक आजाम पटेल सर, शिरशैल खानापुरे सर, मलीन्नाथ भूषणगी सर,भरती म्हेत्रे मॅडम,बसवराज कर सर, विकास बोर्डीकर सर, गणेश ओहोळ सर,वैष्णवी परमशेट्टी मॅडम,भारत राठोड सर, आफ्रिन शेख मॅडम, झिरीन बांगी मॅडम व जयभिम तरुण मंडळ सिन्नूर चे आधारस्तंभ चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष सुरेश सोनकांबळे, संगप्पा उजनी, धर्मा मांग, खाजपा सोनकांबळे, लक्ष्मीपुत्र कांबळे,हनामंत सोनकांबळे, जयभिम सोनकांबळे, पिंटू मांग, सांगप्प सोनकांबळे, सुनील सोनकांबळे, अनिल सोनकांबळे इत्यादी उपस्तित होते. हा कार्यक्रम यशवी करण्यासाठी जयभिम तरुण मंडळ सिन्नूर चे कार्यकर्ते पदाधिकारी समाजबांधव मोठया संख्याने उपस्थिती होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240