रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन....


मुरूम, ता. उमरगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन बापूराव पाटील करताना पदाधिकारी, रक्तदाते व अन्य.
मुरूम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी)
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यशवंत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर शुक्रवारी (ता. १८) रोजी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद गुतेदार, महालिंग बाबशेट्टी, सतिश सावंत आदींची उपस्थिती होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हावळे, उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड, सचिव अमित देडे, सहसचिव डॉ. अजिंक्य मुरूमकर, जिल्हा कृषी पणन तज्ञ अमित भालेराव, प्राचार्य आकाश गवई, माजी नगरसेविका संध्या सावंत, माजी नगरसेविका मीरा सोमवंशी, मुख्याध्यापिका उर्मिला तुपेरे, अश्विनी कांबळे, तृप्ती गायकवाड, आनंद कांबळे, किरण गायकवाड, आशिष गवई, उत्कर्ष गायकवाड, वैभव कांबळे, प्रशांत कांबळे, सुरज कांबळे, शुभम सावंत, अमर भालेराव, प्रविण सुर्यवंशी, मलकेश वाघमारे, किशोर सुरवसे, समीर सोमवंशी, विवेक भालेराव, प्रसाद बनसोडे, संतोष कांबळे, अभिजीत कांबळे आदींनी पुढाकार घेतला.  मातोश्री डी एम एल टी कॉलेजचे विद्यार्थी,श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ. सागर पतंगे, विजय केवडकर, योगेश सोनकांबळे, किशोर खरोसे ऋतिक मेत्रे, अजय रोडगे, राहुल कांबळे आदींनी रक्त संकलनाचे काम पाहिले. अशा समाज उपयोगी  उपक्रमामुळे डॉ. आंबेडकर यांच्या समाजसेवेच्या विचारांना आणि मानवतेच्या मूल्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले. रक्तदानानंतर सहभागी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमाने सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दिल्याने परिसरातील नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.                                          

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर