डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद...

डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद...


प्रतिनिधी -सोलापूर 

सामाजिक, न्याय, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर भारतीय समाज उभा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासमोर येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले.


येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये विद्यार्थी विकास विभाग , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दामा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील,  सरचिटणीस प्रा. महेश माने सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. प्रभाकर कोळेकर डॉ. केदारनाथ काळवणे डॉ. संजय गायकवाड प्राचार्य डॉ. मधुकर पवार आधीची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक  डॉ. युवराज सुरवसे यांनी केले.  यावेळी सपाटे म्हणाले,  संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याची काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले.डॉ.मधुकर पवार डॉ. युवराज सुरवसे यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक वैचारिक अधिष्ठान या ग्रंथाचे  राष्ट्रीय परिषदेत तीन खंड प्रकाशित करण्यात आले. वालचंद महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले यावेळी डॉ. किशोर जोगदंड, डॉ. दशरथ रसाळ , विनोद आखाडे, सुजाता हावळे यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. तर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी दुसऱ्या सत्रात बीजी भाषण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आदर्श मूल्यांची अंमलबजावणी करण्याची गरज यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमास प्राचार्य मंजुश्री पाटील डॉ. शीला स्वामी डॉ शिवाजी वाघमोडे, डॉ. विकास शिंदे, डॉ.राणी मोटे, डॉ. सज्जन पवार डॉ.विष्णू वाघमारे डॉ. धनंजय मोगले, डॉ मनोज कसबे, डॉ. दरेप्पा बताले, प्रा रेवण बैरुंणगीकर, डॉ. किशोर थोरे प्रा.  संतोष गवळी,  डॉ. वाल्मीक कीर्तीकर , डॉ. नागेश गायकवाड , डॉ. अभिमन्यू ओहळ, श्री दत्ता भोसले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सोनाली गिरी व  प्रा. लक्ष्मी रेड्डी यांनी केले तर आभार डॉ. अरुण सोनकांबळे यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर