महात्मा बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान.
![]() |
बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अनिता मुदकन्ना, कमलाकर मोटे, दत्ता इंगळे, शिवशरण वरनाळे व अन्य. |
मुरूम, ता. उमरगा,( प्रतिनिधी )
महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा रविवारी (ता. २७) रोजी बसव सहकार भवनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटी चे कमलाकर मोटे होते. प्रमुख अतिथी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना, मुरूमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दत्ता इंगळे, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना, बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थी संध्या उटगे, विष्णू जाधव, राहुल देशपांडे, प्रवीण गायकवाड, तेजस्विनी मुदकन्ना, शुभम गायकवाड, वैशाली माने, वैभव सातलगे, शंकर मडोळे, निकिता जाधव आदींचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लखन भोंडवे, तेजस्विनी मुदकन्ना यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. दत्ता इंगळे यांनी या परिसरातील बसवेश्वर पतसंस्था म्हणजे एक सामाजिक उपक्रमशील संस्था म्हणून नावलौकिकास पात्र ठरत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तबदारीचे व संघर्षाचे कौतुक करत त्यांना सदिच्छा दिल्या. डॉ. अनिता मुदकन्ना म्हणाल्या की, यश मिळवण्यासाठी प्रामाणिक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य, योग्य दिशा आणि मनोबल ठेवल्यास यश हमखास मिळते. अपयश आले तरी त्यातून शिकत पुढे जाणे हेच खरे शिक्षण आहे. आजचा सत्कार हा विद्यार्थ्यांसाठी नव्या प्रेरणेचा स्त्रोत ठरेल. अध्यक्षीय समारोपप्रसंगी कमलाकर मोटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशरण वरनाळे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अशोक जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे संचालक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहर व परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240