प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते नामवीणा सप्ताहाचे शुभारंभ.

नामवीणा सप्ताह शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळे, महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
प्रतिनिधी-अक्कलकोट
         येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात आज दिनांक १९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
       प्रारंभी मुख्य गाभाऱ्यात मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते वीणा पुजन होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर मंदार महाराज पुजारी व महेश इंगळे यांचे हस्ते प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी आहे. याप्रसंगी उज्वलाताई सरदेशमुख, इरपा हिंडोळे, कौशल्या जाजू, प्रदीप हिंडोळे, अक्षय सरदेशमुख, बाबर, निर्मलाताई हिंडोळे, तेली, स्वाती गंभीरे, भंडारे, प्रसाद सोनार, बाळासाहेब घाटगे, शिवाजीराव घाटगे, प्रसन्न हत्ते, नागनाथ गुंजले, गिरीश पवार, काशिनाथ इंडे, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर