डॉ.रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवपूरस्कार जाहीर.


प्रतिनिधी -ता.मुरूम 
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग काशिनाथ पुराणे यांना  ए.डी. फौंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार २०२५ निमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
दि.२५मे वार रविवार रोजी सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे फौंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी पत्राद्वारे कळविले आहे. डॉ.रामलिंग पुराणे यांचा संघटनात्मक धोरण, सामाजिक कार्य, पत्रकारिता वर पकड मजबूत असून, समाजासाठी उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि सातत्य असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पन्नास हुन अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. डॉ.पुराणे यांचे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. तालुका,जिल्हा,राज्य,राष्ट्रीय पातळीवर त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. राज्यातील धाराशिव,पुणे,वर्धा,मुंबई येथील आझाद मैदान, दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. बेरोजगार, कष्टकरी, शेतकरी, आरोग्यविषयक सह समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे संघर्ष कायम चालू असते. उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुरूम याठिकाणी एका सामान्य भूमिहीन शेतमजूर यांच्या घरी त्यांचा जन्म जरी झाला असून तळागाळातील सामान्य नागरिकांचे समस्यांचे त्यांना जाण आहे आणि त्याचेच रूपांतर एका आंदोलनकारी संघर्षात झाला. उमरगा तालुक्यातील शकेडो नागरिकांना रेशन कार्ड असून धान्य मिळत नव्हते, अनेक नागरिकाजवळ रेशनकार्ड नव्हते अशा जनसामान्यां नागरिकांसाठी त्यांनी लढा उभा करून त्यांना स्वखर्चाने शासन दरबारी पाठपुरावा करून धान्य व रेशन कार्ड मिळवून दिले. राज्यातील होमगार्ड समस्या विषयीचे त्यांचे आंदोलन राज्यात आणि दिल्ली येथे गाजले आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जीवन बिमा, त्यांची पदे, अपात्र होमगार्डना पूर्वरत कामावर रुजू करून घेतले असून त्यांचा ब्रिटिश कालीन कायद्यात बदल होण्यासाठी दिल्ली आणि मुंबई सरकार कडे पाठपुरावा चालू आहे. डॉ.पुराणे यांना आतापर्यंत सामाजिक कार्यातील डॉक्टरेट,समाजभूषण, कोरोना योद्धा, जननायक,समाजचिंतक, लोकतंत्र के प्रहरी,शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ अशा विविध पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ए डी फौंडेशनच्या वतीने त्यांना २०२५ चा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  गौरव पुरस्कार २०२५" जाहीर करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर