Posts

Showing posts from September, 2024

सोलापूर महानगरपालिके कडून पर्यावरण दूत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन 2024 सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात २६ व २७ सप्टेंबर रोजी साजरे करण्यात आले.  पर्यावरण दुत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी  इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. ईको नेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे. या संघटनेमार्फत  अनेक औषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारे, फळे व फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम ही या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.ही संस्था मागेल त्याला झाड तेही  मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, संघटना, मंडळ व अनेक गृहनिर्माण सोसायट्या कडून झाडाचे रोपाची मागणी होते. इकोनेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते व वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी घेतात . तसेच या वसुंधरा संमेलन 2024 मध्ये त्यांनी शालेय विद्...

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज शाहीर रमेश खाडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम.

Image
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज शाहीर रमेश खाडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम. प्रतिनिधी-सोलापूर  ज्येष्ठ नागरिक संघ बंथनाळ मठ जुळे सोलापूर यांच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी अॅड. सोमनाथ वैद्य यांच्या सौजन्याने शाहीर रमेश खाडे व सहकारी यांचा सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच (सोलापूरचा मार्शल लॉ) या विषयावर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.डी. जोशी असून, सदर कार्यक्रम इंडियन मॉडेल स्कूल, जुळे सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. तरी सर्व ज्येष्ठ नागरिक बंधूभगिनींनी व परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे नुतन अध्यक्ष सिद्राम सनके आणि इतर पदाधिकारी यांनी केले आहे. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय शिरसाट यांची निवड.

Image
भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय शिरसाट यांची निवड. प्रतिनिधी-सोलापूर भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय  शिरसाट यांची निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे पत्र माजी मंत्री तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष(बापू)देशमुख यांच्या शुभहस्ते संजय शिरसाट यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष अनिल कांबळे,भाजपा मंडल अध्यक्ष आनंद शरणाप्पा बिराजदार उपस्थित होते.सदरील निवडीबद्दल संजय शिरसाट यांचे सर्वच स्तरातून कौतुक  होत आहे. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

ॲड.विश्वनाथ पाटील यांची मैंदर्गी मुलींच्या शाळेस दिली सदिच्छा भेट.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाचे मुंबई हायकोर्ट चे काम पाहणारे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा मैंदर्गी या शाळेला सदिच्छा भेट दिली.  ॲड.विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद सोलापूर येथे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सोलापूर येथे आलेअसता वृत्तपत्रातील आमचे शाळेचे बातमी वाचून  स्वेइच्छेने शाळेला भेट दिली.भेटीदरम्यान त्यांचा 8वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत होता.मुलगा मुंबईत नामांकित मोठया शाळेत शिक्षण घेतोय.मुलाने मैंदर्गी शाळेतील विद्यार्थी व शाळेची साहित्य बाग बगीच्या रंगरंगोटी बघून आमच्या शाळेपेक्षा सुंदर शाळा असे आहे अशी प्रतिक्रिया दिली. ॲड.विश्वनाथ पाटील यांनी शाळेचे परसबाग,बगीचा पाण्याचे सोयीस्कर रंगरंगोटी विज्ञान खोली,कॉम्प्युटर खोली, मुख्याध्यापक कार्यालय, मध्यान भोजनाची व्यवस्था सर्व पाहून शाळेचे कौतुक केले.तुमच्या शाळेचा दर्जा पहात निश्चितच राज्यस्तरीय नामांकनात नावारूपाला यावे व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात यावे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.पुढे बोलताना ते असे म्हणाले की,मी आतापर्यंत अशी स्वच्छ शाळा, सुंदर ...

सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना-छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण.

Image
सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना-छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण. प्रतिनिधी-सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ प्रकाश महानवर,  प्र.कलुगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिवा योगिनी घारे मॅडम यांच्या संकल्पनेतून सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना व ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी  वृक्ष लागवड अभियानात छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये बांबू, ताड,स्वीट महागुनी,लिंब आणि जांभूळ या विविध प्रकारांच्या वृक्षांच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.युवराज सुरवसे  यांच्या समवेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी वर गुरुवार दि.१९ सप्टेंबर२०२४रोजी...

राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने श्रीम.एन.बी.बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर सन्मानित.

Image
राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने श्रीम.एन.बी.बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर सन्मानित. प्रतिनिधी-सोलापूर  स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य माधव नगर येथील श्रीम.एन. बी बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर यांना "राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आला. सिंहगड इंजिनियर कॉलेज केगाव येथे आयोजित "राज्यस्तरीय आदर्श शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी पुरस्कार" वितरण समारंभाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, संयोजक व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई बापूसाहेब अडसूळ, प्रदेश उपाध्यक्ष ,इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर सचिन जगताप साहेब यांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.  शिवाजी व्हनकडे सर श्रीम....

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे कुलदीप जंगम यांचा स्वागतपर सत्कार.

Image
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे कुलदीप जंगम यांचा स्वागतपर सत्कार. प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत राज्यात अग्रेसर राहावे यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे अशी आशा संघटनेसमोर व्यक्त केली. याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संगटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे,सचिव सोमलिंग कोळी,लक्ष्मण बनसोडे,सादिक तांबोळी,राहुल राठोड,पवन कांबळे,श्रीरंग बनसोडे,शिवानंद कोळी,बाबुराव गायकवाड,भीमाशंकर साबळे,संग्राम सोनकांबळे,मनोहर साबळे,बाळासाहेब नवगिरे,शिवशंकर राठोड,मनोहर दुपारगुडे,उमेश वाघमारे,राहुल भडकुंबे आदी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८...

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या सेवेत बससेवा कार्यान्वित;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते बस सेवेचे शुभारंभ

Image
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या सेवेत बससेवा कार्यान्वित; प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते बस सेवेचे शुभारंभ   प्रतिनिधी - अक्कलकोट   श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा कार्यान्वित झाली आहे. त्याचे शुभारंभ आज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे  कै.कल्याणराव इंगळे हे एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. अक्कलकोट तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावातून तंत्रनिकेतन शिक्षणासाठी येथे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहेत.  अशा विद्यार्थ्यांना ही बस सेवा लाभदायी ठरेल असे मनोगत व्यक्त करून देवस्थानच्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजय पवार, धीरज जनगोंडा, दर्शन घाटगे, उमेश सो...