सोलापूर महानगरपालिके कडून पर्यावरण दूत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव.

प्रतिनिधी-सोलापूर 
सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन 2024 सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात २६ व २७ सप्टेंबर रोजी साजरे करण्यात आले. 
पर्यावरण दुत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. ईको नेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे. या संघटनेमार्फत अनेक औषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारे, फळे व फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम ही या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.ही संस्था मागेल त्याला झाड तेही  मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, संघटना, मंडळ व अनेक गृहनिर्माण सोसायट्या कडून झाडाचे रोपाची मागणी होते. इकोनेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते व वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी घेतात . तसेच या वसुंधरा संमेलन 2024 मध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन तथा आयुक्त IAS  शितलताई तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या कडून उपायुक्त तैमुर मुलाणी, वसुंधरा अभियानाचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील यांच्या हस्ते डॉ मनोज देवकर व राम हुंडारे यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे व सहाय्यक पर्यावरणाधिकारी स्वप्निल सोलंकर, उद्यान अधीक्षक,सर्व महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा व वसुंधरा संमेलन पार पडले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर