सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना-छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण.
सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना-छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण.
प्रतिनिधी-सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ प्रकाश महानवर, प्र.कलुगुरू लक्ष्मीकांत दामा,
कुलसचिवा योगिनी घारे मॅडम यांच्या संकल्पनेतून सोलापूर विद्यापीठात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना व ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी वृक्ष लागवड अभियानात छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३५० विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यामध्ये बांबू, ताड,स्वीट महागुनी,लिंब आणि जांभूळ या विविध प्रकारांच्या वृक्षांच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.युवराज सुरवसे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी वर गुरुवार दि.१९ सप्टेंबर२०२४रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ.राजेंद्र वडजे यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानातून सोलापूर विद्यापीठाचा परिसर वृक्ष लागवडीच्या माध्यमातून फुलविण्याचा मानस व्यक्त केला व विद्यार्थ्यांबरोबर वृक्ष लागवडीसाठी स्वतःही सहभाग घेतला.याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील माळी विभागातील आठ ते दहा कर्मचारी या वृक्ष लागवडीच्या अभियानात विद्यार्थ्यांसमवेत वृक्ष लागवडसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना सहकार्यही केले.
यावेळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील३५ विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.युवराज सुरवसे यांनी देखील यावेळी विद्यार्थ्याबरोबर स्वतः वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेऊन या कुलगुरू सरांचे एक लाख वृक्ष लागवडीचे संकल्पना सत्यात येण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. यावेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.डॉ. राजेंद्र वडजे सर, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.युवराज सुरवसे यांच्यासमवेत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240