ॲड.विश्वनाथ पाटील यांची मैंदर्गी मुलींच्या शाळेस दिली सदिच्छा भेट.
प्रतिनिधी-अक्कलकोट
जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाचे मुंबई हायकोर्ट चे काम पाहणारे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा मैंदर्गी या शाळेला सदिच्छा भेट दिली.
ॲड.विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद सोलापूर येथे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सोलापूर येथे आलेअसता वृत्तपत्रातील आमचे शाळेचे बातमी वाचून स्वेइच्छेने शाळेला भेट दिली.भेटीदरम्यान त्यांचा 8वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत होता.मुलगा मुंबईत नामांकित मोठया शाळेत शिक्षण घेतोय.मुलाने मैंदर्गी शाळेतील विद्यार्थी व शाळेची साहित्य बाग बगीच्या रंगरंगोटी बघून आमच्या शाळेपेक्षा सुंदर शाळा असे आहे अशी प्रतिक्रिया दिली.
ॲड.विश्वनाथ पाटील यांनी शाळेचे परसबाग,बगीचा पाण्याचे सोयीस्कर रंगरंगोटी विज्ञान खोली,कॉम्प्युटर खोली, मुख्याध्यापक कार्यालय, मध्यान भोजनाची व्यवस्था सर्व पाहून शाळेचे कौतुक केले.तुमच्या शाळेचा दर्जा पहात निश्चितच राज्यस्तरीय नामांकनात नावारूपाला यावे व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात यावे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.पुढे बोलताना ते असे म्हणाले की,मी आतापर्यंत अशी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पाहिले नाही या धर्तीवर सर्व जिल्हा परिषद शाळा निर्माण केले तर भविष्यात जिल्हा परिषद शाळा अग्रेसर राहील.
ॲड.विश्वनाथ पाटील यांनी शाळेला ज्या अत्यावश्यक असलेल्या वस्तू 11000/- रुपयाचे स्पीच बॉक्स(डाईस बोर्ड) स्टीलचे भेट म्हणून दिले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240