राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने श्रीम.एन.बी.बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर सन्मानित.

राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने श्रीम.एन.बी.बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर सन्मानित.


प्रतिनिधी-सोलापूर 
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य माधव नगर येथील श्रीम.एन. बी बंडा प्रशालतील शिवाजी व्हनकडे सर यांना "राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले जीवन गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आला.
सिंहगड इंजिनियर कॉलेज केगाव येथे आयोजित "राज्यस्तरीय आदर्श शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी पुरस्कार" वितरण समारंभाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, संयोजक व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई बापूसाहेब अडसूळ, प्रदेश उपाध्यक्ष ,इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर सचिन जगताप साहेब यांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. 
शिवाजी व्हनकडे सर श्रीम.एन. बी बंडा प्रशालेत गेले
24  वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. अध्यापनाबरोबर शाळेत विद्यार्थ्यांचे गुणवत्ता आणि शाळेची दर्जा वाढीसाठी नवनवीन उपक्रम घेतात.  शैक्षणिक, सामाजिक  अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संघटनेत कार्यरत आहेत. गरीब होतकरू आणि अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था व गोशाळा साठी चारा वाटप अशा अनेक समाजोपयोगी कार्य करत आहेत. तसेच आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून  व्याख्यान, भजन ,सुगम संगीत, नाम सप्ताह आदी धार्मिक कार्यात सहभाग असतो
शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, वारकरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आजतागायत  आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक, आदर्श गुरुवर्य ,समाजभूषण, शिक्षक रत्न ,  राष्ट्रीय उपक्रमशील शिक्षक असे आत्तापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तर , अठरा ते वीस पुरस्कार मिळालेले आहेत. शासनमान्य राज्यस्तरीय जीवन गौरव  पुरस्कार मिळाल्याबद्दल  संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक , शिक्षकवृंद, पालक ,विद्यार्थी त्याचबरोबर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर