Posts

Showing posts from August, 2024

इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम.

Image
इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी ( ता.दक्षिण सोलापूर)येथील वि गु शिवदारे प्रशालेत एम.के.फाऊंडेशन तर्फे वह्या वाटप करताना महादेव कोगनुरे, संभाजी माने,इनोंदगी कोटे, चंद्रकांत गुरव, यल्लपा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे आदी. प्रतिनिधी-सोलापूर सहकार क्षेत्रातील कार्यामुळेच वि गु शिवदारे यांना सहकारमहर्षी म्हणून लोक सन्मानित करत असत.सहकारमहर्षी स्वर्गीय विरुपक्षप्पा गुरप्पा शिवदरे यांना लोक प्रेमाने शिवदारे आण्णा म्हणून ओळखत होते. एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व थोर सामाजिक कार्यकर्ते म्हणून शिवदारे आण्णा हे परिचित होते. आण्णांच्या या सहकार क्षेत्रातील योगदानामुळेच लोक त्यांना सहकारमहर्षी म्हणून सन्मानित करत असल्याचे मत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी( ता.दक्षिण,सोलापूर )येथील वि गु शिवदार...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील भक्तीमय वातावरण पाहून भारावलो-न्यायमूर्ती एन.माला यांचे मनोगत.

Image
न्यायमूर्ती एन.माला यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट दत्त उपासनेतून श्री स्वामी समर्थांची आराधना हे संपूर्ण भारतासह दक्षिण भारतातील चेन्नई येथेही मोठ्या भक्ती भावाने होत असते. स्वामी समर्थांचे अनेक भक्त तेथेही आहेत. त्यापैकीच एक आम्हीही स्वामीभक्ती आहोत. श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान अक्कलकोट हे दक्षिण भारतापासून खूप अंतरावर आहे. वेळोवेळी येथील त्यांच्या मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात येऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी त्यांची आराधना नेहमीच जीवन जगण्यास बळ देते. त्या प्रेरणेतून आज आम्ही प्रत्यक्ष येथील श्री वटवृक्ष मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. येथे आल्यानंतर मंदिरातील श्री स्वामींची आरती, अत्यंत भक्तीमय व भावपूर्ण स्वामींचे दर्शन घेणारे अनेक भक्त, मंदिरातील मन शुद्ध करणारा वातावरण, समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी केलेले आदरतिथ्य, मंदिरात स्वामींचा वास जाणवणारा सहवास हे सर्व भक्तीमय वातावरण पाहून आम्ही भारावलो असल्याचे मनोगत चेन्नई हायकोर्टचे माननीय न्यायमूर्ती एन. माला यांनी व्यक्त केले. ते नुकतेच ये...

७८ वा स्वातंत्र्यदिन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगी संचलित,श्री.बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला करजगी मोठ्या उत्साहात साजरा.

Image
  प्रतिनिधी-करजगी ७८ वा स्वातंत्र्यदिन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगी संचलित श्री.बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला करजगी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दयानंद उंबरजे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. सर्वांनी सामुहिकरित्या राष्ट्रगीत गायन केले.दरम्यान बसवराज इंग्रजी माध्यमाच्या सर्व बाल चिमुकल्यानी देशभक्तीपरन भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. पुर्वा खसकी,अंकीता पाटील अतीशय चांगल्या पद्धतीने भाषणे केले. किशोरकुमार पोतदार सर यांनी अतिशय उत्तमरीत्या सांस्कृतिक कार्यक्रम विभाग संभाळला.     याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात कशाप्रकारे अभ्यास करावा व यशस्वी व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.          याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस बी.बिराजदार पर्यवेक्षकएस एस सिंदगी,माजी मुख्याध्यापक बसवराज निंबाळ,माजी पर्यवेक्...

राज्यव्यापी अधिवेशनास हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते एकवटणार-सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सूळ, सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिप्परगे,व शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी यांनी दिली माहिती.

Image
प्रतिनिधी - सोलापूर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५.०० पर्यंत राळेगण सिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे आयोजित केले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विस्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे. राळेगण सिद्धी हे माननीय अण्णा हजारे यांचे गाव असून मा.अण्णा हजारे यांचे माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राळेगण सिद्धी ही जागरुक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पंढरी असून या विकास आणि ज्ञान पंढरीमध्ये १८ऑगष्ट २०२४ रोजी राज्याच्या सर्व जिल्हे व विभागातून सुमारे पाचशे पेक्षा अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मा.अण्णा हजारे यांचे प्रेरणादाई मार्गदर्शन होणार आहे. तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ  मा.विवेक वेलणकर,यशदा प्रशिक्षण संस्...

राज्य शासनाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या;अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक.

Image
अतुल कुलकर्णी : सोलापूर पोलिस अधीक्षक, प्रतिनिधी- सोलापूर राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट क्र. चार येथील प्रियंका नारनवरे यांची पोलिस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर या पदावर बदली करण्यात आली होती. ती बदली रद्द करण्यात आल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलिस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था निवडणुकीची आदर्श आचारंहिता अशा बाबी लक्षात घेवून कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंकज शिरसाट (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (पोलि अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे (अपर पोलिस अधीक्षक, पालघर), अभिजीत शिवथरे (अपर पोलिस अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर ...

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन; हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार.

Image
प्रतिनिधी-सोलापूर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५.०० पर्यंत राळेगण सिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे आयोजित केले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विस्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे.राळेगण सिद्धी हे माननीय अण्णा हजारे यांचे गाव असून मा.अण्णा हजारे यांचे माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राळेगण सिद्धी ही जागरुक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पंढरी असून या विकास आणि ज्ञान पंढरीमध्ये १८ऑगष्ट २०२४ रोजी राज्याच्या सर्व जिल्हे व विभागातून सुमारे पाचशे पेक्षा अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मा.अण्णा हजारे यांचे प्रेरणादाई मार्गदर्शन होणार आहे.तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ मा. विवेक वेलणकर,यशदा प्रशिक्षण संस्थेमधील म...

राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनचा नागपंचमी सणानिमित्त पर्यावरणपूरक स्तुत्य उपक्रम.

Image
प्रतिनिधी -सोलापूर राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन वतीने दि.९ऑगस्ट २०२४ रोजी  पर्यावरण पूरक नागपंचमी साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम सिद्धेश्वर कन्या प्रशाला,सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेल्या नागाची प्रतिकृती व वारुळाचे पूजन करण्यात आले.तद्नंतर राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन अध्यक्षा तथा निवेदिका प्रांजली मोहीकर यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. नागपंचमी सण साजरा करण्यामागील पारंपरिक प्रथा विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच साप दिसल्यानंतर त्यांना न मारता आपला जीव वाचवत प्राण्यांचाही जीव कसा वाचवायचा यासाठी पर्यावरण पूरक संरक्षण कसे करता येईल यावरही मार्गदर्शन केले. राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना सापांच्या आणि नागांच्या संरक्षणासाठी तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता यावर आधारित सर्पमित्र,पक्षी निरीक्षक राहुल उंब्रजकर यांच्यातर्फे छायाचित्र(PPT)द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनात सापाबद्दल असलेल्या शंका व प्रश्न आदींचे निराकरण निराकरण राहुल उंब्रजकर आणि सुहास भोसले सर यांनी क...

लोकरत्न कै.श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या ६५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

Image
लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या ६५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर. रविवार,दि.११/०८/२०२४  वेळ - स. ९.०० वा. विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा. रविवार दि. ११/०८/२०२४  वेळ सायं. ६.०० वा. विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा. मा.श्री.सचिन दादा कल्याणशेट्टी  आमदार,अक्कलकोट  विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला आहे.  तरी कार्यक्रमास समस्त नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.                         ▪️विकास कामे▪️ • राष्ट्रीय महामार्ग ते कासेगांव ३ कोटी खडकी रस्ता - २५ लक्ष • कासेगाव-बडजी रस्ता २.५० कोटी RO प्लॉट ११ लक्ष • कासेगाव-धोत्री रस्ता २.१९ कोटी • जलजीवन मिशन - ८८ लक्ष • नवीन बुद्ध विहार बांधणे - १५ लक्ष • ब्रम्हनाथ तलाव दुरुस्ती - १० लक्ष • एल.ई. डी स्ट्रीट लाईट ७.४४ लक्ष • आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत ८ लक्ष                             • आयोजक • श्री.यशपाल (भैय्या) श्रीकांत वाडकर सरपंच,...

नित्यार्थ आरोग्यवर्धिनी कर्मचार्यांचे पगार वेळेवर करण्यात यावे-सैदप्पा झळकी.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यातील नित्यार्थ आरोग्यवर्धिनी चे पगार वेळेवर करण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे. काल सैदप्पा झळकी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ओव्हाळ यांना निवेदनादन  देवून त्यात नमूद केली आहे की,संपूर्ण जिल्यातील नित्यार्थ आरोग्य वर्धिनी कर्मचारी यांच्या गेल्या पाच महिन्यापासून पगार नाही.संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य वर्धिनी कर्म चार्यांचे पगार झाली असून फक्त सोलापूर जिल्यातील कर्मचार्यांचे पगार झाली नाही.गेल्या मार्च महिन्या पासून काम करत आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नवीन कर्मचारी नियुक्ती करुन वैद्यकीय केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.तरी आजतागायत नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्या पगार झाली नाही.    आपण वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पगार होण्या कामी सहकार्य करावे.अन्यथा रिपाइं(आठवले गट)च्या वतीने आंदोलन छेडण्याच्या इशारा सैदप्पा झळकी यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रति,आरोग्यमंत्री महाराष्ट्र, डां.रामदास आठवले.सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार...

१० ऑगस्ट धम्म परिषद.. चला...मोहोळ चला... मोहोळ

Image
 १० ऑगस्ट धम्म परिषद..  चला...मोहोळ चला... मोहोळ प्रमुख मार्गदर्शक- भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष- डॉ.राजरत्नजी आंबेडकर साहेब, प्रमुख उपस्थिती उद्योजक तथा समाज सेवक मा.राजाभाऊ खरे, उद्घाटक- भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष हनुमंते दिनेश मारोतराव,राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांतजी जाधव राज्य संघटक वैभव धबडगे, जि.अध्यक्ष राजश्री ताई गायकवाड व बौद्ध भिखु संघ भन्ते संघानंदजी,भन्ते सुमेधजी  नागसेन,भन्ते धम्मबोधी,भन्ते सुमंगल, भन्ते राजरत्न, भन्ते सचित बोधी यांच्या उपस्थितीत दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी घाटुळे मंगल कार्यालय,कुरुल रोड  मोहोळ येथे धम्म परिषद आयोजित केली असुन त्यानिमित्त सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक मोहोळ येथून रॅली निघनार आहे.भोजनाची/जेवणाची सोय दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आसणार आहे.ठीक २ वा.धम्म परिषदला सुरुवात होनार आहे.तरी सर्व बांधवांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.               🙏  जय भीम...नमो बुद्धाय🙏 -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध...

अक्कलकोट तालुका स्तरीय-पावसाळी कब्बडी स्पर्धेत करजगी येथील श्री बसवराज माध्यमीक प्रशालाचे यश.

Image
अक्कलकोट तालुका स्तरीय-पावसाळी कब्बडी स्पर्धेत करजगी येथील श्री बसवराज माध्यमीक प्रशालाचे यश. प्रतिनिधी -अक्कलकोट  २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील- तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धा मध्ये १७ वयोगटातील(मुलांचे) श्री बसवराज  माध्यमीक प्रशाला करजगी प्रथम क्रमांक  पटकाविला आहे.   ‌‌ या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   सदर प्रसंगी करजगी गावात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल  विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांनी वतीने मोठ्या प्रमाणात वाजत- गाजत, फटाक्यांचे अतिशबाजी करुन जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

नगरपालिका मुलींची शाळेला भाटिया ट्रस्ट मुंबई तर्फे 25000/-रु.देणगी.

Image
  प्रतिनिधी -अक्कलकोट  नगरपालिका मुलांमुलींची मराठी शाळा न.1,या शाळेतील विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी भाटिया ट्रस्ट, (मुंबई )तर्फे माजी मुख्याध्यापक अंबादास हरवाळकार यांनी मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांच्याकडे रु. 25000 ची देणगी दिली.शाळेच्या वतीने  उपक्रमशील शिक्षिका सौ.रझिया जमादार यांनी देणगीचा चेक स्वीकारला.यावेळी भाटिया ट्रस्ट (मुंबई )चे चेअरमन वीरेन मर्चंट,विश्वस्त अविनाश शिंग, सुशांत हरवाळकर(मुंबई पोलीस),जेष्ठ शिक्षिका फर्जाना अन्सारी, संगीता बावलत्ती,  मंजू कोक्कळगी आणि पालक विध्यार्थी उपस्थित होते.यावेळी इयत्ता 6वी वर्गातील विध्यार्थी 100%उपस्थित होते म्हणून त्या सर्व विध्यार्थ्यांना प्रत्येकी एकेक पेन वाटप करून मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता बावलत्ती यांनी केले तर आभार मंजू कोक्कळगी यांनी मानले. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०