नगरपालिका मुलींची शाळेला भाटिया ट्रस्ट मुंबई तर्फे 25000/-रु.देणगी.
प्रतिनिधी-अक्कलकोट
नगरपालिका मुलांमुलींची मराठी शाळा न.1,या शाळेतील विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी भाटिया ट्रस्ट, (मुंबई )तर्फे माजी मुख्याध्यापक अंबादास हरवाळकार यांनी मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांच्याकडे रु. 25000 ची देणगी दिली.शाळेच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका सौ.रझिया जमादार यांनी देणगीचा चेक स्वीकारला.यावेळी भाटिया ट्रस्ट (मुंबई )चे चेअरमन वीरेन मर्चंट,विश्वस्त अविनाश शिंग, सुशांत हरवाळकर(मुंबई पोलीस),जेष्ठ शिक्षिका फर्जाना अन्सारी, संगीता बावलत्ती,
मंजू कोक्कळगी आणि पालक विध्यार्थी उपस्थित होते.यावेळी इयत्ता 6वी वर्गातील विध्यार्थी 100%उपस्थित होते म्हणून त्या सर्व विध्यार्थ्यांना प्रत्येकी एकेक पेन वाटप करून मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता बावलत्ती यांनी केले तर आभार मंजू कोक्कळगी यांनी मानले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240