राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनचा नागपंचमी सणानिमित्त पर्यावरणपूरक स्तुत्य उपक्रम.



प्रतिनिधी-सोलापूर
राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन वतीने
दि.९ऑगस्ट २०२४ रोजी  पर्यावरण पूरक नागपंचमी साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम सिद्धेश्वर कन्या प्रशाला,सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेल्या नागाची प्रतिकृती व वारुळाचे पूजन करण्यात आले.तद्नंतर राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन अध्यक्षा तथा निवेदिका प्रांजली मोहीकर यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले.


नागपंचमी सण साजरा करण्यामागील पारंपरिक प्रथा विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच साप दिसल्यानंतर त्यांना न मारता आपला जीव वाचवत प्राण्यांचाही जीव कसा वाचवायचा यासाठी पर्यावरण पूरक संरक्षण कसे करता येईल यावरही मार्गदर्शन केले.
राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना सापांच्या आणि नागांच्या संरक्षणासाठी तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता यावर आधारित सर्पमित्र,पक्षी निरीक्षक राहुल उंब्रजकर यांच्यातर्फे छायाचित्र(PPT)द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनात सापाबद्दल असलेल्या शंका व प्रश्न आदींचे निराकरण निराकरण राहुल उंब्रजकर आणि सुहास भोसले सर यांनी केले.



यानंतर विद्यार्थ्यांच्या नागपंचमीनिमित्त शाळेमध्ये बसवण्यात आलेले विविध पारंपारिक खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे तसेच सहशिक्षक शशिकांत माचनुरकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.




या पर्यावरण पूरक नागपंचमीच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.प्रेमचंद मेने,विश्वस्त ज्योती मेने,वेदांत मोहीकर,संस्थेचे सदस्य  राम हुंडारे,गिता हुंडारे,निकम ताई,राजेश केकडे ,मनोज देवकर,सुहास भोसले,राहुल उंब्रजकर आदी मान्यवरव उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर