७८ वा स्वातंत्र्यदिन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगी संचलित,श्री.बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला करजगी मोठ्या उत्साहात साजरा.
प्रतिनिधी-करजगी
७८ वा स्वातंत्र्यदिन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगी संचलित श्री.बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला करजगी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
सर्वांनी सामुहिकरित्या राष्ट्रगीत गायन केले.दरम्यान बसवराज इंग्रजी माध्यमाच्या सर्व बाल चिमुकल्यानी देशभक्तीपरन भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. पुर्वा खसकी,अंकीता पाटील अतीशय चांगल्या पद्धतीने भाषणे केले. किशोरकुमार पोतदार सर यांनी अतिशय उत्तमरीत्या सांस्कृतिक कार्यक्रम विभाग संभाळला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात कशाप्रकारे अभ्यास करावा व यशस्वी व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस बी.बिराजदार पर्यवेक्षकएस एस सिंदगी,माजी मुख्याध्यापक बसवराज निंबाळ,माजी पर्यवेक्षक सी सी चडचण आदींसह संस्थेचे सचिव व संस्था संचलित सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमास गावातील व पंचक्रोशीतील सर्व आजी माजी विद्यार्थी,शेतकरी बांधव,पालक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमा ची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश पिंरगुडे सर,मल्लिकार्जुन येळदारे सर व महांतेश जवळगी सर यांनी केले व आभार प्रदर्शन सागर शावळ सर यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व प्रमुख अतिथी,विद्यार्थी व पालक वर्गांची अल्पोहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240