इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम.
इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम.
सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी( ता.दक्षिण,सोलापूर )येथील वि गु शिवदारे प्रशालेत एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव यांच्या तर्फे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महादेव कोगनुरे हे बोलत होते.प्रथमतः वि गु शिवदारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या हस्ते शिवदारे आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी माने हे उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष इनोंदगी कोटे,सचिव चंद्रकांत गुरव,संचालक यल्लपा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे,उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख,नूरअहमद बागवान भीमाशंकर बंदीछोडे, गोरख राऊत, मुख्याध्यापक नेल्लुरे,शिक्षक कनोजी सर,व शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.पुढे बोलताना महादेव कोगनुरे यांनी वि गु शिवदारे आण्णांच्या राजकीय व सहकार प्रवास विषयी आपले विचार व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व अभ्यासूवृत्तीने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच यावेळी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे महादेव कोगनुरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी गुरव,द्वितीय क्रमांक जैतुन शेख, तृतीय क्रमांक पायल गाडेकर यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हमाणे सर तर आभार श्रीमती वंजारी मॅडम यांनी मानले.-
-------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240