पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी - समीर गायकवाड.

प्रतिनिधी-सोलापूर जिल्हा परिषदेत व्याख्यान.... पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे मत साहित्यिक समीर गायकवाड यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमीत्त साहित्यिक समीर गायकवाड यांचे राजमाता आहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात घेणेत आलेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी सिईओ कुलदीप जंगम हे होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने दिनांक 30 मे 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात साजरी करण्यांत आली . मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, लेखाधिकार...