अखिल भारतीय मजदूर कल्याण संघ तथा राष्ट्रीय एकता संघाचा ४३ वा वर्धापन दिन थाटात साजरा.


प्रतिनिधी-सोलापूर
दि.२० मे २०२५ रोजी अखिल भारतीय मजदूर कल्याण संघ तथा राष्ट्रीय एकता संघाचा ४३ वा वर्धापन दिन सोलापुरातील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी अ.भा.म.क.संघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधि अधिकरी सहा.पोलीस आयुक्तालय वर्ग,१ सोलापूरचे प्रा.ॲड.अरविंद देडे,अ.भा.म.क.सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव नंदकुमार दिड्डी,अ.भा.म.क.सेवा संघाचे केंद्रीय सदस्य माणिक गावडे, भारतीय रिजर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी तथा कोषाध्यक्ष दिलीप कदम,जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे पुष्प अर्पण अभिवादन करण्यात आले.व पर्यावरण पूरक संदेश म्हणून रोपाला पाणी घालून कार्यक्रमास उपस्थित सर्वांनीच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन केले. दरम्यान प्रमुख पाहुण्यांचा भारतीय संविधानाची प्रत,शाल व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडागळे यांनी केले.प्रास्ताविकात गंगाधर खंडागळे यांनी अ. भा. म. क. सेवा संघाचा उद्देश व पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती सांगितली माहिती दिली. तदनंतर केंद्रीय सदस्य माणिक गावडे यांनी सेवा संघाच्या कार्यपद्धतीविषयी कार्यक्रमास उपस्थित सर्वांना संबोधित केले. विशेषतः कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वक्ते प्रा.ॲड.अरविंद देडे यांनी भारतीय भारतीय संविधान आणि मूलभूत हक्क या विषयावर व्याख्यान दिले. संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकार याविषयी त्यांनी माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात संघाचे राष्ट्रीय महासचिव नंदकुमार दिड्डी यांनी अ.भा.म .क. सेवा संघाची स्थापना ,ध्येय ,उद्देश, आणि संविधानाचा जागर या विषयावर मार्गदर्शन केले.या देशातील मजदूर ,आदिवासी आणि मागास वर्ग यांच्यावर होणारे अन्याय,अत्याचार रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने वाटचाल कशाप्रकारे करावी याबाबत सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप गायकवाड,लक्ष्मण चंदनशिवे,पांडुरंग चलवादी,चेतन गवळी,स्वप्नाली गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार जनार्धन मोरे यांनी मानले.
--------------------------------------
जनता संघर्ष न्यूज सोलापूर 
संपादक- सिद्धार्थ भडकुंबे 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर