विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा गौरव.

प्रतिनिधी -सोलापूर 
जिल्हा परिषेदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांची मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर निवड झाले बद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते सत्कार करणेत आला. 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिईो कुलदीप जंगम हे होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिल्पा शेळकंदे, माजी जिल्हा परिषद  सदस्य अरूण तोडकर, मंगळवेढा चे गटविकास अधिकारी कदम , अक्कलकोट चे गटविकास अधिकारी शंकर कवितके, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. माने, लिपीक वर्गीय कर्मचारी अॅड. देशपांडे, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, संघटनेचे कास्ट्राईब चे कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर, विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर सुतार, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, अधिक्षक झेड ए शेख, लेखा विभागाचे हुच्चे प्रमुख उपस्थित होते. 
ग्रामपंचायत व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने तुळशीचा हार व स्मृती चिन्ह देऊन सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते गौरव करणेत आला. 
शेळकंदे यांचे जिद्द, चिकाटी वाखणण्यासारखी - सिईओ जंगम
माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, ग्रामसेवक यांचे प्रश्न, 
विस्तार अधिकारी पदोन्नोती असे अनेक प्रश्न मार्गी लावणे साठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे यांनी परिश्रम घेतले. असे मत सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. शेळकंदे यांचे कडून खुप शिकण्यासारखे होते. त्यांचे कडे असलेली कामाविषयी निष्ठा सातत्य, जिद्द वाखाणण्या सारखी आहे असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले. 
सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी - शेळकंदे
सोलापूर जिल्ह्यात ७ वर्षे सेवा करणेची संधी मिळाली. काम करताना कामाचा शेवटचा दिवस म्हणून काम केले. माझी वसुंधरा अभियाना राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांचेमुळे प्रेरणा मिळाली. तत्कालीन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली अॅम्बुलन्स व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व्हॅन घेता आली. सिईओ जंगम यांनी काम करणेची संधी दिली. तर  अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांचे समव्त सलग तीन आषाढी यात्रा पार पाडता आल्या. सेवेचा आनंद घेता आला असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी बोलताना सांगितले. 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शिल्पा शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विविध संघटनेचे वतीने सत्कार करणेत आला.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर