महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना निवेदन सादर.
सोलापूर आरोग्य केंद्रात नेटवर्क आणि इतर समस्यामुळे फेस रिडींग होत नाही. त्यामुळे वेतन प्रणालीसाठी बंधनकारक करू नका असे निवेदन महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना देण्यात आले. आयुक्त आरोग्य सेवा यानी मार्च २०२५ च्या पत्रानुसार १ एप्रिल २०२५ पासून आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन बायोमेट्रीक व फेस रिडिंग हजेरी नुसार करण्याचे आदेश दिले आहे. त्या संदर्भाने राज्यातील काही उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी हे कर्मचारी यांनी बायोमेट्रीक व फेस रिडिंग प्रणाली द्वारे हजेरी न लावल्यास वेतन काढले जाणार नाही असे आदेश वारंवार काढून आम्हा महिला कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे, दबावाचे वातावरण निर्माण करीत आहेत. बायोमेट्रीक व फेस रिडिंग बाबत अद्याप कोणताही शासन आदेश नाही, पॅरामेडिकल तांत्रिक क्षेत्रीय महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नाहीत, प्रा.आ. केंद्र, उपकेंद्र येथे आंतररुग्ण विभाग व फिरती करुन कार्यक्षेत्रात सेवा दयावी लागते.अनेक प्रसंगी तातडीची तात्काळ वैद्यकिय सेवा द्यावी लागते. अपूरे मनुष्यबळ, अपुरे निवासस्थाने. अपूर्ण मुलभूत सुविधा या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. शिवाय बायोमेट्रीक फेस रिडींग करता विभागाकडून कोणत्याही प्रकारचे साधने (मोबाईल, बायोमेट्रीक मशिन, सीम,डेटा) पुरविण्यात आलेले नाहीत. कार्यक्षेत्रात दुर्गम भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसते.मुख्यालयापासून लोकेशन २ ते ३ कि.मी. लांबीचे अंतर दाखविले जात असल्यामुळे बायोमेट्रीक फेस रिडींगला अडचण होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचेकडे जुने मोबाईल असल्यामुळे सुध्दा त्यावर नवीन प्रणालीचे ॲप चालत नाहीत.अश्या अनेक तांत्रिक अडचणी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्भवत आहे. त्या अनुषंगाने बायोमेट्रीक, फेसरिडिंग उपस्थितीनुसार वेतन प्रणाली बंधनकारक नको असे निवेदन महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष कलावती चव्हाण, उपाध्यक्षा नयनतारा जाधव, सचिवा सुप्रिया जगताप आदी उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्ष कलावती चव्हाण, उपाध्यक्षा नयनतारा जाधव, सचिवा सुप्रिया जगताप आदी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240