Posts

Showing posts from October, 2023

वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर जिंकली लोकांची मने.

Image
प्रतिनिधी - सोलापूर दक्षिण सोलापूर  तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी पदावर रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, त्यांच्याच सूचनेनुसार वळसंगची टीम कार्यरत असल्याने सामान्य नागरिकांचा पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर झालेला आहे.जे सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरत होते आता ते सामान्य नागरिक आपल्या समस्या,तक्रारी घेऊन सहजरीत्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत. याचा फायदा गुन्ह्याची उकल करण्यासाठी होत आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.अनिल सनगल्ले हे वळसंग पोलीस ठाण्याला रुजू झाल्यापासून विविध गावातील सामाजिक उपक्रमाला भेट देऊन युवक, वृद्ध, महिला, मुलींचे मनोबल वाढवित आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण अगदी सहजरीत्या होत आहे. जो सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरत होता, तो सामान्य नागरिक अनिल सनगल्ले यांच्यामुळे सहजरीत्या जाऊन आपले प्रश्न मांडत आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. प्रत्येक समाजामध्ये सामाजिक  सलोखा राहावा यास...

कवी नायगांवकरांचे काव्यसंग्रहांचा किर्तीमान जागतिक स्तरावर - महेश इंगळे.

Image
कवी अशोक नायगांवकरांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट  जेष्ठ कवी अशोक नायगांवकर हे महाराष्ट्राच्या काव्य क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत. इ.स. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या     अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर होते. या संमेलनात ते बोलताना म्हणाले होते की महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल असा सल्ला ते नेहमी काव्यप्रेमी व वाचकांना देतात. इस्त्रायल, कतार, डेट्राईट, दुबई, न्यूकॅसल, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक, बफेलो, लंडन, लॉसएंजेलिस, शिकागो, सिंगापूर, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. नायगावकर मंचावर उभे राहिले, की काहीतरी रंगतदार, मजेदार ऐकायला मिळणार या उत्सुकतेने श्रोतेवर्ग उत्सुक असतात, म्हणून कवी नायगांवकरांच्या काव्यसंग्रहांचा किर्तीमान जागतिक स्तरावर असल्याचे प्रतिपादन येथील श्री ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक(आबा) साळुंखे-पाटील यांची वर्णी.

Image
प्रतिनिधी - सोलापूर अजित पवार गटाच्या सोलापूर राष्ट्रवादी - काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक (आबा)साळुंखे- पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात गुरुवार दि.१२ऑक्टोबर रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे-पाटील यांनी याअगोदर सलग ८ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय ६ वर्षे विधान परिषदेचे आमदार, ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्षपद आणि ३ वर्षे नवी मुंबईचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यातत् सिंहाचा वाटा असलेले माजी आमदार दीपक(आबा) साळुंखे-पाटील यांची पुनश्च जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी माजी खासदार व मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस श...

असांसर्गिक आजारांची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक.-गटविकास अधिकारी महेश पाटील.

Image
प्रतिनिधी - सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असांसर्गिक आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली. तपासणी शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत कुलकर्णी, सहाय्यक गटविकास शितल बुलबुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सागर मंगेडकर हे प्रमुख उपस्थितीत होते.  यावेळी पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व हृदयविकाराची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवयवदानाची शपथ देण्यात येवून सर्वांचे मरणोपरांत अवयवदानाचे संमती पत्र भरून घेण्यात आले. याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी महेश पाटील म्हणाले की असांसर्गिक आजारांची ठराविक कालावधीनंतर नियमितपणे तपासणी करून घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने NCD कार्यक्रमावर भर दिलेला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य क...

SVCS हायस्कूल व ज्यु.कॉलेज,बोरामणी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

Image
प्रतिनिधी - सोलापूर दि.२ऑक्टोबर रोजीमहात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती प्रशालेत साजरी करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून सहशिक्षक  कस्तुरे सर आणि सहशिक्षिका पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार एस. ए सर उपस्थित होते. याप्रसंगी प्रशालेतील समर्थ गाडेकर,नम्रता केत,सुजाता हुक्कीरे,श्रेया खोत,भाग्यश्री विभुते,वैष्णवी जावळे,अंकिता आचलारे, विजयालक्ष्मी पटणे,श्रावणी कोरे,सानिका हंगरगे विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन,कार्य देशासाठी केलेले कार्य,त्याग,आंदोलन,चळवळ याबद्दल अतिशय सुंदररित्या मनोगत भाषणद्वारे सादर केले. कार्यक्रमाच्या अखेरीस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर यांनी स्वातंत्र्य चळवळीतील जहाल आणि मवाळ गट,ताशकंद करार, पंतप्रधान म्हणून लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन कार्य याबाबत अधिक माहिती देत विद्यार्थ्यानी केलेल्या भाषणाचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन...

वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त महाराष्ट्राचे वैशिष्ट्य - प्रांताधिकारी उदमले.

Image
विठ्ठलराव उदमले व कुटुंबीयांचा मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, तहसीलदार बाळासाहेब शिरसट व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट पंढरीच्या वारीप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो स्वामी भक्त, स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येत आहेत ही बाब आम्हाला निदर्शनास आल्याने खूपच समाधान वाटले. या भाविकांमध्ये सर्व जाती-धर्माचे सर्व वयाचे लोक असतात. ते सर्वजण त्या एकाच स्वामींची लेकरे असतात. ते सदैव स्वामींचे नामस्मरण  गुणगुणत चालतात. त्यामुळे वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन क्रमांक -२ चे प्रांताधिकारी विठ्ठलराव उदमले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी प्रांताधिकारी विठ्ठलराव उदमले व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांची कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंग...

श्री बसवराज हायस्कूल,करजगी येथे “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न.

Image
श्री बसवराज हायस्कूल,करजगी येथे “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न. प्रतिनिधी - अक्कलकोट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे भाजपा कायदा असेल अध्यक्ष ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बसवराज हायस्कूल करजगी येथे  “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.  यावेळी स्वतः ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेबांनी हातात झाडू घेऊन शालेय परिसर विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छ केला. यावेळी संस्थेचे संचालक व पदाधिकारी तसेच प्रशालेचे...