श्री बसवराज हायस्कूल,करजगी येथे “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न.
श्री बसवराज हायस्कूल,करजगी येथे “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी- अक्कलकोट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे भाजपा कायदा असेल अध्यक्ष ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बसवराज हायस्कूल करजगी येथे “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी स्वतः ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेबांनी हातात झाडू घेऊन शालेय परिसर विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छ केला.
यावेळी संस्थेचे संचालक व पदाधिकारी तसेच प्रशालेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240