SVCS हायस्कूल व ज्यु.कॉलेज,बोरामणी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.




प्रतिनिधी- सोलापूर
दि.२ऑक्टोबर रोजीमहात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती प्रशालेत साजरी करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून सहशिक्षक  कस्तुरे सर आणि सहशिक्षिका पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार एस. ए सर उपस्थित होते.


याप्रसंगी प्रशालेतील समर्थ गाडेकर,नम्रता केत,सुजाता हुक्कीरे,श्रेया खोत,भाग्यश्री विभुते,वैष्णवी जावळे,अंकिता आचलारे, विजयालक्ष्मी पटणे,श्रावणी कोरे,सानिका हंगरगे विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन,कार्य देशासाठी केलेले कार्य,त्याग,आंदोलन,चळवळ याबद्दल अतिशय सुंदररित्या मनोगत भाषणद्वारे सादर केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर यांनी स्वातंत्र्य चळवळीतील जहाल आणि मवाळ गट,ताशकंद करार, पंतप्रधान म्हणून लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन कार्य याबाबत अधिक माहिती देत विद्यार्थ्यानी केलेल्या भाषणाचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजापूरे मॅडम यांनी केले.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.