असांसर्गिक आजारांची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक.-गटविकास अधिकारी महेश पाटील.



प्रतिनिधी- सोलापूर
तालुका आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असांसर्गिक आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली. तपासणी शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत कुलकर्णी, सहाय्यक गटविकास शितल बुलबुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सागर मंगेडकर हे प्रमुख उपस्थितीत होते. 
यावेळी पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व हृदयविकाराची तपासणी करण्यात आली.





याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवयवदानाची शपथ देण्यात येवून सर्वांचे मरणोपरांत अवयवदानाचे संमती पत्र भरून घेण्यात आले.
याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी महेश पाटील म्हणाले की असांसर्गिक आजारांची ठराविक कालावधीनंतर नियमितपणे तपासणी करून घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने NCD कार्यक्रमावर भर दिलेला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात या तपासण्या पुर्णपणे मोफत केल्या जातात. नागरिकांनी या निरोगी आयुष्य जगण्यासाठी व भविष्यातील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी या तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन केले. 
या तपासणी शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली पारशेट्टी, डॉ. सुनयना हाळणूर, यांच्यासह आरोग्य सेविका एस.जे.शेख, आय. एम. आलमेलकर. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील मानसरोग उपचार समन्वयक स्नेहा गायकवाड व सुप्रिया शिवशरण यांनी तपासणी केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक चन्नवीर घत्तरगी, आरोग्य सेवक त्रिमूर्ती राऊत, अमीत महाडिक, अक्षय गुंजाळ, अतूल राऊत, तालुका समुह व्यवस्थापक बाळासाहेब भंडे, कविता हिरेमठ, अस्मिता कुलकर्णी,राजेश शिंदे व रेवणसिद्ध म्हेत्रे, दिपाली बनसोडे,एस .एन. तांबोळी, किरण शिंदे यांनी परिश्रम घेतले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर