वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त महाराष्ट्राचे वैशिष्ट्य - प्रांताधिकारी उदमले.
![]() |
विठ्ठलराव उदमले व कुटुंबीयांचा मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, तहसीलदार बाळासाहेब शिरसट व अन्य दिसत आहेत. |
प्रतिनिधी - अक्कलकोट
पंढरीच्या वारीप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो स्वामी भक्त, स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येत आहेत ही बाब आम्हाला निदर्शनास आल्याने खूपच समाधान वाटले. या भाविकांमध्ये सर्व जाती-धर्माचे सर्व वयाचे लोक असतात. ते सर्वजण त्या एकाच स्वामींची लेकरे असतात. ते सदैव स्वामींचे नामस्मरण गुणगुणत चालतात. त्यामुळे वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन क्रमांक -२ चे प्रांताधिकारी विठ्ठलराव उदमले यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी प्रांताधिकारी विठ्ठलराव उदमले व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांची कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी उदमले बोलत होते. यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट, अक्कलकोट तलाठी सुभाष डोईफोडे, सुनील नंदीकोले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद पवार, विपूल जाधव आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.
-----------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240