राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक(आबा) साळुंखे-पाटील यांची वर्णी.
प्रतिनिधी-सोलापूर
अजित पवार गटाच्या सोलापूर राष्ट्रवादी - काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक (आबा)साळुंखे- पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात गुरुवार दि.१२ऑक्टोबर रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे-पाटील यांनी याअगोदर सलग ८ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय ६ वर्षे विधान परिषदेचे आमदार, ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्षपद आणि ३ वर्षे नवी मुंबईचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे.
पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यातत् सिंहाचा वाटा असलेले माजी आमदार दीपक(आबा) साळुंखे-पाटील यांची पुनश्च जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी माजी खासदार व मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते उमेश पाटील, कार्यालयीन कोषाध्यक्ष संजय बोरगे, सुरेश आबा पालवे, प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240