वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर जिंकली लोकांची मने.


प्रतिनिधी- सोलापूर
दक्षिण सोलापूर  तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी पदावर रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, त्यांच्याच सूचनेनुसार वळसंगची टीम कार्यरत असल्याने सामान्य नागरिकांचा पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर झालेला आहे.जे सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरत होते आता ते सामान्य नागरिक आपल्या समस्या,तक्रारी घेऊन सहजरीत्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत. याचा फायदा गुन्ह्याची उकल करण्यासाठी होत आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.अनिल सनगल्ले हे वळसंग पोलीस ठाण्याला रुजू झाल्यापासून विविध गावातील सामाजिक उपक्रमाला भेट देऊन युवक, वृद्ध, महिला, मुलींचे मनोबल वाढवित आहेत.त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण अगदी सहजरीत्या होत आहे.जो सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरत होता, तो सामान्य नागरिक अनिल सनगल्ले यांच्यामुळे सहजरीत्या जाऊन आपले प्रश्न मांडत आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.


प्रत्येक समाजामध्ये सामाजिक  सलोखा राहावा यासाठी ते स्वतः  विविध गावातील धार्मिक सण, उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वच समाजामध्ये एकोपा राहावा यासाठी युवक, वृद्ध, तरुण- तरुणींना मार्गदर्शन करतात.
नवरात्रोत्सव, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, मुस्लीम बांधवांच्या सणामध्ये सहभागी होत सार्वजनिक मंडळांना रक्तदान, आरोग्य  शिबिरे, वृक्षारोपण, विविध  सामाजिक उपक्रम राबविण्यास मंडळांना प्रोत्साहन देतात यामुळे स्तरातून कौतुक होत आहे किंबहुना जनमानसात पोलीसांची प्रतिमा उंचावली आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
 

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर