Posts

साप्ताहिक सूर्यपुत्रचे संपादक प्रा. तुकाराम मारुती सरडे यांचे निधन.

Image
प्रतिनिधी- सोलापूर  येथील ज्येष्ठ पत्रकार तथा, साप्ताहिक सूर्यपुत्रचे संस्थापक-संपादक आणि धरणग्रस्त संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम मारुती सरडे (वय ८७ वर्षे) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.  त्यांच्यावर मोदी स्मशानभूमित  अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे परिवारांसह नातेवाईक, पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सुना, मुली, जावई, नातवंडे, नातसुना व परतुंडे आहेत. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार.

Image
इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार. प्रतिनिधी-अक्कलकोट दि. २६/१०/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या प्रयत्नांतून शाळेचा बदललेला चेहरा मोहरा पाहण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी यांच्या तृषा गुप्ता मॅडम (अध्यक्ष ), अनुराधा चांडक मॅडम (माजी असोसिएशन सचिव आणि माजी जिल्हा अध्यक्ष), लक्ष्मी चव्हाण मॅडम ( झोनल सबऑर्डिनेटर), हेमा काबरा मॅडम ( ई ॲडमिन) यांनी शाळेला भेट दिली. शाळेला भेट देत असताना शाळेतील परसबागेचे विशेष कौतुक त्यांनी केले. शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. दिनकर भारती यांनी तयार केलेल्या QR code चे विशेष कौतुक त्यांनी सदर प्रसंगी केले. सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त होताना सांगितले की, शाळेचा परिसर आमच्या मनाला खूप भावला.तसेच शाळेतील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री साक्षी स्वामी आणि उपमुख्यमंत्री नवेता पाटील यांच्याशी हितगुज करत विशेष कौतुक केले तसेच प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते यासंदर्भात हिजगुज केले.शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी बचत बँकेचे...

सोलापूर दक्षिण मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश प्रकाश आंबेडकर यांचे कडून AB फॉर्म स्वीकारताना संतोष पवार.

Image
सोलापूर दक्षिण मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश प्रकाश आंबेडकर यांचे कडून AB फॉर्म स्वीकारताना संतोष पवार.  प्रतिनिधी-सोलापूर  दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडी कडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते A B फॉर्म देण्यात आला.  यावेळी यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे सर, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिन जाधव आदी उपस्थित होते. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

आपत्ती धोके निवारण व उपाय" या विषयावर व्याख्यान.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,  सोलापूर  राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनीयरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती धोके निवारण जनजागृती सप्ताह -२०२४ साजरा करीत असताना "आपत्ती धोके निवारण व उपाय" या विषयावर मंगळवार ,दि २१ऑक्टोबर २०२४ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  व्याख्याते म्हणून शक्तिसागर ढोले  आपत्ती व्यवस्थापन विभाग सोलापूर व प्रमुख पाहुणे,  डॉ.सत्यम दुधनकर  प्राचार्य,(टीम आयकॉन कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी इंजीनियरिंग सोलापूर) व अर्चना बिसोई (सहाय्यक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी)यांच्या उपस्थितीत तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर पवार प्राचार्य,  छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शक्ती सागर ढोले यांनी आपत्ती व्यवस्थापन यावर बोलताना म्हणाले, आपत्ती ही सांगून कधीच येत नाही ...

सोलापूर महानगरपालिके कडून पर्यावरण दूत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन 2024 सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात २६ व २७ सप्टेंबर रोजी साजरे करण्यात आले.  पर्यावरण दुत डॉ.मनोज देवकर व वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी  इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. ईको नेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे. या संघटनेमार्फत  अनेक औषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारे, फळे व फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम ही या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.ही संस्था मागेल त्याला झाड तेही  मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, संघटना, मंडळ व अनेक गृहनिर्माण सोसायट्या कडून झाडाचे रोपाची मागणी होते. इकोनेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते व वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी घेतात . तसेच या वसुंधरा संमेलन 2024 मध्ये त्यांनी शालेय विद्...