इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार.

इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार.


प्रतिनिधी-अक्कलकोट
दि. २६/१०/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या प्रयत्नांतून शाळेचा बदललेला चेहरा मोहरा पाहण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी यांच्या तृषा गुप्ता मॅडम (अध्यक्ष ), अनुराधा चांडक मॅडम (माजी असोसिएशन सचिव आणि माजी जिल्हा अध्यक्ष), लक्ष्मी चव्हाण मॅडम ( झोनल सबऑर्डिनेटर), हेमा काबरा मॅडम ( ई ॲडमिन) यांनी शाळेला भेट दिली.
शाळेला भेट देत असताना शाळेतील परसबागेचे विशेष कौतुक त्यांनी केले. शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. दिनकर भारती यांनी तयार केलेल्या QR code चे विशेष कौतुक त्यांनी सदर प्रसंगी केले. सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त होताना सांगितले की, शाळेचा परिसर आमच्या मनाला खूप भावला.तसेच शाळेतील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री साक्षी स्वामी आणि उपमुख्यमंत्री नवेता पाटील यांच्याशी हितगुज करत विशेष कौतुक केले तसेच प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते यासंदर्भात हिजगुज केले.शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी बचत बँकेचे  चेअरमन पवन बिराजदार आणि व्हॉईस चेअरमन राजेश पाटील यांच्याशी प्रत्यक्ष बँकेचे व्यवहार कसे चालतात यासंदर्भात चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या भेटकार्डचे विशेष कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
        शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी बचत बँकेची निवडणूक प्रक्रिया बद्दल बारकाईने चौकशी करत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांचे विशेष कौतुक केले. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेत अशी शाळा आता पर्यंत पाहिली नसल्याची महत्त्वाची प्रतिक्रिया सदर प्रसंगी दिली.
         शाळेचे मुख्याध्यापक  दत्तात्रय पोतदार सर यांनी शाळेच्या एकूण कामकाजाचा घोषवारा सदर प्रसंगी मांडला.उपस्थित मान्यवरांनी शाळेचा एकूण परिसर पाहून शाळेला पाण्याची गंभीर समस्या दूर होण्यासाठी बोअरवेल मारून देण्याचे सदर प्रसंगी जाहीर केले. तसेच शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, टॉवेल, तसेच दिवाळी भेटकार्ड देत यथोचित सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका हाजराबी बागवान यांनी केले.सदरच्या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.शाळेचे शिक्षक हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे,अनिता काटकर, हाजराबी बागवान,संध्या बशेट्टी, दिनकर भारती, सोनाली भारती, मयुरी फुलारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर