आपत्ती धोके निवारण व उपाय" या विषयावर व्याख्यान.
प्रतिनिधी-सोलापूर
मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनीयरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती धोके निवारण जनजागृती सप्ताह -२०२४ साजरा करीत असताना "आपत्ती धोके निवारण व उपाय" या विषयावर मंगळवार ,दि २१ऑक्टोबर २०२४ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्याते म्हणून शक्तिसागर ढोले आपत्ती व्यवस्थापन विभाग सोलापूर व प्रमुख पाहुणे, डॉ.सत्यम दुधनकर प्राचार्य,(टीम आयकॉन कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी इंजीनियरिंग सोलापूर) व अर्चना बिसोई (सहाय्यक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी)यांच्या उपस्थितीत तर
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर पवार प्राचार्य, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर पवार प्राचार्य, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शक्ती सागर ढोले यांनी आपत्ती व्यवस्थापन यावर बोलताना म्हणाले, आपत्ती ही सांगून कधीच येत नाही याकरिता आपत्ती ही नैसर्गिक व मानवनिर्मित असू शकते.आपत्ती जरी सांगून येत नसेल परंतु आपत्ती करिता आपण सदैव तत्पर असले पाहिजे . आपत्तीवेळी मनुष्यहानी आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होत असतं तरीही यावर प्रत्येकाने आलेल्या आपत्तीला प्रसंगी तोंड कसे द्यावे व मनुष्यहानी वित्तहानी कशाप्रकारे कमीत कमी होऊ शकेल यासाठी यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. विविध उपकरणांच्या साह्याने अत्याधुनिक इंटरनेटच्या माध्यमातून ॲप्स डाऊनलोड करून प्रसंगी होणाऱ्या परिस्थितीची पूर्व चाहूल कशा प्रकारे मिळविता येते याची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाबरोबर पीपीटी प्रेझेंटेशनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांसमोर या विषयाची मांडणी केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे प्राचार्य यांनी मानवी संकट हे आपणच यासाठी कशाप्रकारे कारणीभूत आहोत व वेळप्रसंगी नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी उपलब्ध परिस्थितीचा वापर कसा करावा व संकट निवारण यासाठी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ.युवराज सुरवसे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील डॉ अरुण मित्रगोत्री, डॉ अरुण सोनकांबळे, डॉ अभिमन्यू ओहोळ,डॉ राणी मोटे ,प्रा संतोष गवळी, राजाभाऊ घंदुरे, शहाजी जाधव ,महेश डेंगळे ,संतोष अलकुंटे, केशव लोंढे ,दत्ता भोसले संजय थिटे यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक , प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी रेड्डी यांनी केले तर
आभार डॉ.वाल्मीक किर्तीकर यांनी मानले.
आभार डॉ.वाल्मीक किर्तीकर यांनी मानले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240