रश्मीज् अकौंटन्सी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनानिमित्त गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा संपन्न.

रश्मीज् अकौंटन्सी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनानिमित्त गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा संपन्न. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर गेली ७ वर्षे आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणार्या रश्मीज् अकौंटन्सी क्लासने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उज्वल यशाची परंपरा जपली असून दि.१६जून,२०२४रोजी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनाचे औचित्य साधून गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए.नितीन गुप्ता सर हे उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी रश्मीज् अकौंटन्सी क्लासच्या सौ.रश्मी परमेश्वर बोराडे व परमेश्वर बोराडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी.ए.नितीन गुप्ता सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ.रश्मी बोराडे यांनी केले. परीक्षेत घागवगवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या ...