महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अक्कलकोट तालुका कार्यकारणी जाहीर तिसऱ्यांदा अध्यक्षपदी कमलाकर सोनकांबळे यांची निवड.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अक्कलकोट तालुका कार्यकारणी जाहीर-तिसऱ्यांदा अध्यक्षपदी कमलाकर सोनकांबळे यांची निवड.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज(सोलापूर)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणीची बैठक नुकतीच जुना डाक बंगला अक्कलकोट येथे जेष्ठ पत्रकार चेतन जाधव,जेष्ठ पत्रकार बसवराज बिराजदार व जेष्ठ पत्रकार दयानंद दणुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.य़ा बैठकीत सर्व सदस्य पत्रकारांच्या उपस्थित नूतन अध्यक्षपदी कमलाकर सोनकांबळे तर सचिवपदी विश्वनाथ चव्हाण याची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य दयानंद दणुरे यांनी जुन्या अध्यक्ष व सचिव यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी.अशी सूचना मांडली होती.त्यास गौतम बालशंकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सर्व सदस्यांच्या उपस्थित अध्यक्षपदी कमलाकर सोनकांबळे तर सचिवपदी विश्वनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नूतन कार्यकारणी अध्यक्षपदी कमलाकर सोनकांबळे,सचिवपदी विश्वनाथ चव्हाण,कार्याध्यक्षपदी
दयानंद दणुरे,उपाध्यक्षपदी गौतम बाळशंकर,सहसचिवपदी समाधान अहिरे,महेश गायकवाड,संघटकपदी गणेश कुलकर्णी,कार्यक्रम प्रमुख निगप्पा निबाळ,सल्लागार चेतन जाधव,बसवराज बिराजदार, सदस्य विश्वनाथ राठोड,आनंद चौगुले,धोडंप्पा नंदे या सर्वांची कार्यकारणी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की,पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्नशील असुन पत्रकार भवन व पत्रकारांसाठी हक्काचे घर मिळावे यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240