रश्मीज् अकौंटन्सी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनानिमित्त गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा संपन्न.

रश्मीज् अकौंटन्सी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनानिमित्त गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा संपन्न.



प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
गेली ७ वर्षे आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणार्‍या रश्मीज् अकौंटन्सी क्लासने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उज्वल यशाची परंपरा जपली असून दि.१६जून,२०२४रोजी क्लासेसच्या ७व्या वार्धपन दिनाचे औचित्य साधून गुणवंत विध्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.



 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए.नितीन गुप्ता सर हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी रश्मीज् अकौंटन्सी क्लासच्या सौ.रश्मी परमेश्वर बोराडे व परमेश्वर बोराडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी.ए.नितीन गुप्ता सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ.रश्मी बोराडे यांनी केले.
परीक्षेत घागवगवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या.



उपस्थित विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सी.ए.नितीन गुप्ता सर यांनी पुढील शैक्षणिक वाटचाली संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले.शालेय अभ्यासक्रमासोबत कौशल्यपूर्ण शिक्षण ही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असेही त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.'विध्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचं कार्य हे शिक्षक करीत असतात.' रश्मीज् अकौंटन्सी क्लासच्या माध्यमातून रश्मी बोराडे यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.त्या क्लासेस संदर्भात विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     सदरचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रश्मीज् अकौंटन्सी क्लासच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्ही सुलाखे व संकेत मगर या विदयार्थ्यांनी केले,तर आभार रश्मी  बोराडे व परमेश्वर बोराडे यांनी मानले.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर