Posts

अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश .

Image
अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा यथोचित सन्मान करुन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश होताना. प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.अखेर एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी दि २ मे २०२४ रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,काँग्रेस चे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान ७ मे  रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे. अलिकडे अनेक राजकीय नेत्यांची मह...

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महादेव कोगनुरे यांची घरी भेट./प्रचार कार्याला ब्रेक लागताच आता गुप्त गाठी-भेटीला येणार वेग.

Image
प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर लोकसभा निवडणुक प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना आता राजकीय नेत्यांची रात्रीचा खेळ सुरु होताना पहायला मिळत आहे. कारण लोकसभा निवडणूक प्रचाराला ब्रेक लागताच आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग येणार आहे. याचाच भाग म्हणून बुधवार दि 1 मे रोजी रात्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटक उमराणीचे महादेव सावकार बहिरगुंडे यांनी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन भेट घेऊन गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. आता नेमके महादेव कोगनुरे हे काय भुमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिले आहेत. कारण मागील काही दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार रामसातपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही महादेव कोगनुरे यांची भेट घेत बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे व महादेव सावक...

धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न. पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध.

Image
धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न. पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध. धर्मसंकीर्तन सोहळ्यात व्यासपीठावर पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांनी गायनसेवा सादर करताना दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यातील आजचे सहावे पुष्प पुण्यातील स्वामीभक्त गायिका  माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांच्या शास्त्रीय गायन व भक्ती संगीत गायन सेवा सादरीकरणाने गुंफले गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला. या शास्त्रीय गायन सेवेत व भक्ती संगीत सेवेत  गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर आदींनी  सुरुवातीला राग हंसध्वनी, वातापी गणपती, स्वामी समर्...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड राजकीय वर्तुळात चर्चा...!कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.

Image
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड राजकीय वर्तुळात चर्चा...!कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला. प्रतिनिधी-सोलापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचे सोशल मिडीयावरुन चर्चा होताना दिसून येत आहे.यामुळे महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करणार की काय ? याची चर्चा आज सकाळपासूनच एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांतून सुरु आहे.या चर्चेमुळे महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढला आहे.कारण गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या भुमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते की,महादेव कोगनुरे हे काय भुमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमधून होती.आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची सोलापूर पार्क स्टेडियमवर जाहीरसभा असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर येथे आले असता तेव्हा महादेव कोगनुरे व देवेंद्र...

श्री.वटवृक्ष मंदिरात श्री.गुरुलिलामृत पोथी पारायण सेवेस प्रारंभ.

Image
श्री.वटवृक्ष मंदिरात श्री.गुरुलिलामृत पोथी पारायण सेवेस प्रारंभ. पारायण सोहळ्यात श्री गुरु लीलामृत पोथी वाचन करताना उज्वलाताई सरदेशमुख व पारायणकर्ते भक्त दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री.गुरुलीलामृत या पोथीच्या सामुदायिक पारायण सेवेस नुकतेच देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात प्रारंभ झाले. सदर पारायण सेवा आज दिनांक २५ एप्रिल २०२४ ते दिनांक ०५ मे २०२४ अखेर सकाळी ८ ते ११:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यात २६४ भाविकांनी सहभाग नोंदविले असल्याची माहिती सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी दिली. महिला भाविकांची या सोहळ्यात अग्रक्रमाने उपस्थिती आहे. या प्रसंगी बोलताना विश्वस्त महेश गोगी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात पारायण सोहळ्यात श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पोथी वाचन म्हणजे पारायणकर्ते भाविकांन...