अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश .

अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा यथोचित सन्मान करुन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश होताना.







प्रतिनिधी-सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.अखेर एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी दि २ मे २०२४ रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,काँग्रेस चे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान ७ मे  रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे.











अलिकडे अनेक राजकीय नेत्यांची महादेव कोगनुरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या.एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेस मध्ये जाणार याची उत्सुकता एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात होती.अखेर आज महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भुमिका जाहीर केल्याने सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण महादेव कोगनुरे मागच्या १० वर्षापासून सामाजिक कार्य पार पाडताना दिसून आले आहेत. यावरुनच महादेव कोगनुरे हे नक्कीच भाजपात प्रवेश करुन आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करतील अशी भावना कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यातुन व्यक्त केली जात होती.आता महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करुन महायुतीला झटका दिला आहे.महादेव कोगनुरे यांच्या या राजकीय भुमिकेमुळे कार्यकर्त्यांना मात्र अश्चर्याचा धक्का बसला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची ताणलेली उत्सुकता मात्र आता कमी झाल्याचे दिसून येत आहे.


"







कोगनुरे यांच्या प्रवेशाने प्रणितीचा भार हलका झाला" अशा भावना श्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले तसेच "कोगनूरे यांच्या अपेक्षा निश्चितच पुर्ण होतील"असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुका हीच माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमीतच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता माझ्या सामाजिक व राजकीय इनिंगला सुरुवात करीत आहे.गरीब,गरजू, निराधार व जळीतग्रस्तांना आधार देण्याचे काम यापुढे ही अखंडपणे सुरु राहिल.यासाठी आपले बहुमूल्य आशिर्वाद मात्र सदैव माझ्या पाठिश असेल अशी मी आशा व्यक्त करतो.- एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०





Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर