केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महादेव कोगनुरे यांची घरी भेट./प्रचार कार्याला ब्रेक लागताच आता गुप्त गाठी-भेटीला येणार वेग.


प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर लोकसभा निवडणुक प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना आता राजकीय नेत्यांची रात्रीचा खेळ सुरु होताना पहायला मिळत आहे. कारण लोकसभा निवडणूक प्रचाराला ब्रेक लागताच आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग येणार आहे. याचाच भाग म्हणून बुधवार दि 1 मे रोजी रात्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटक उमराणीचे महादेव सावकार बहिरगुंडे यांनी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन भेट घेऊन गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. आता नेमके महादेव कोगनुरे हे काय भुमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिले आहेत. कारण मागील काही दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार रामसातपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही महादेव कोगनुरे यांची भेट घेत बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे व महादेव सावकार बहिरगुंडे तसेच एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्यात बुधवारी रात्री महादेव कोगनुरे यांच्याघरी गुप्त राजकीय बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी लागोपाठ महादेव कोगनुरे यांची गुप्त भेट घेत लोकसभा निवडणुकीत मदतकरण्यासाठी गळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तरी महादेव कोगनुरे हे राजकीय संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. आता महादेव कोगनुरे काय भुमिका घेणार हे येत्या दोन दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे. महादेव कोगनुरे भाजपात जाणार की काँग्रेसला मदत करणार याची उत्सुकता मात्र एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना लागली आहे.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४९

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर