अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश .

अखेर महादेव कोगनुरे यांची भुमिका जाहीर-महादेव कोगनुरे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा यथोचित सन्मान करुन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश होताना. प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.अखेर एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी दि २ मे २०२४ रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,काँग्रेस चे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे. अलिकडे अनेक राजकीय नेत्यांची मह...