वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ...! ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन.

वटवृक्ष मंदिरात भागवत कथेप्रसंगी निरूपण करताना सुधाकर महाराज इंगळे व सहकारी दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट ,( शब्दांकन -श्रीशैल गवंडी.) यंदाच्या अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथेस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्ती भावाने सुरुवात झाली. कथेच्या प्रारंभी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने अवघे वटवृक्ष मंदिर स्वामींच्या नाम गजराने दुमदुमले. सोलापूरचे सुप्रसिद्ध वारकरी संप्रदाय कथाकार ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी याप्रसंगी श्रीमद् भागवत कथेतून धर्म प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे व सहकाऱ्यांचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केले. या कथेप्रसंगी निरूपण करताना ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी भागवताचा एक अर्थ आहे - भगवतः इदं भागवतम् - म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र, भगवत् तत्त्वाचा निर्देश करणारे शास्त्र. जी व्यक्ति भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. ह्याचा अर्थ असा झाला - भगवत्तत्त्व, ते जाणण्याचे साधन (ग्रंथ श्रवण) व ते जाणनारी व्य...